Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Maratha Reservation News :
मुंबई

Maratha Reservation News : मुख्यमंत्र्यांनी बोलवली सर्वपक्षीयांची बैठक; शिंदेंच्या बैठकीला ठाकरे उपस्थिती लावणार ?

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : शिंदेंच्या या बैठकीसाठी ठाकरे उपस्थित राहणार का? याकडे सर्वांचे लक्ष...

Chetan Zadpe

Mumbai News : राज्यभरात मराठा आरक्षणावरून राजकारण पेटलेले आहे. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत आहेत. शासनाच्या जीआरमधील मराठा समाजातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वंशावळीची नोंद ही अट रद्द करावी, अशी प्रमुख मागणी जरांगेची आहे. यामुळे या आंदोलनावर अद्यापही तोडगा निघाला नसताना यासाठी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सर्वपक्षीयांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)

राज्य सरकारच्या वतीने शिंदेंच्या शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर हे मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी जालन्यात गेले होते. पण त्यांच्यासोबतची चर्चा अयशस्वी ठरली. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा आरक्षणाच्या उपोषणाबाबत उद्या (सोमवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली असल्याची माहिती दिली आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उद्या मुंबईत सह्याद्री अतिथिगृहात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही बैठक बोलवली आहे. सत्ताधारी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस, सोबतच राज्यातील सर्व प्रमुख पक्षांना बैठकीसाठी निमंत्रण देण्यात येणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस, मनसे यांच्यासह शिवसेना ठाकरे गटालाही बैठकीचे निमंत्रण दिले जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या या सर्वपक्षीय बैठकीचं निमंत्रण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वीकारतील का? शिंदेंच्या या बैठकीसाठी ठाकरे उपस्थित राहणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठा आंदोलन व मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करून त्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंनी आयोजित केलेल्या या सर्वपक्षीय बैठकीला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच, ठाकरेंनी जर मुख्यमंत्र्यांचे निमंत्रण स्वीकारले तर शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे आणि शिंदे एका बैठकीसाठी पहिल्यांदाच एकत्र येतील. यामुळे ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT