Mumbai News: राज्यभरातील धनगर समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलाच आक्रमक झाला आहे. राज्यात विविध ठिकाणी आंदोलनं करण्यात येत असून अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे यशवंत सेनेच्यावतीने धनगर समाजाला एसटी संवर्गात समाविष्ट करावं, या मागणीसाठी गेल्या पंधरा दिवसांपासून उपोषण आंदोलन सुरू आहे.
यातील काही उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली आहे. याच अनुषंगाने आता धनगर आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने बैठक बोलावली आहे.
(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअॅप चॅनल जॉईन करा)
धनगर आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी दुपारी दोन वाजता सह्याद्री अतिथीगृहावर धनगर आरक्षणासंदर्भात बैठक पार पडणार आहे. या बैठकीला राज्यातील धनगर समाजाचे नेते उपस्थित राहणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे धनगर समजातील नेत्यांसोबत आरक्षणाच्या मुद्यांवर चर्चा करणार आहेत.
दरम्यान, धनगर आरक्षण आणि योजनांसंदर्भात बैठक आयोजित करण्याबाबत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले होते. तसेच भाजपचे आमदार राम शिंदे यांनी देखील धनगर आरक्षणांच्या मुद्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे आता धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीवर राज्य सरकार काय तोडगा काढतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.