eknath Shinde, Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde News: ''बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांनी अमित शाहांना...''; मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

Maharashtra Politics: ...म्हणून राहुल गांधींना त्याची शिक्षा मिळालीच पाहिजे.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे तळवे चाटले अशी खरमरीत टीका केली होती. त्याला प्रत्त्युत्तर देताना उद्धव ठाकरेंनी अमित शाहांना मोगॅम्बो म्हटलं होतं. मात्र, यावरुन चांगलंच राजकारण तापलं आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही याच टीकेवरुन ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

शिंदे म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ३७० कलम हटवलं. त्यांच्याविरोधात काही विरोधक वक्तव्यं करतात, शाहांना ‘मोगॅम्बो’ म्हणतात. मात्र,‘मोगॅम्बो’हा ‘मिस्टर इंडिया’चित्रपटातील व्हिलन होता. बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांनी अमित शाहांना ‘मिस्टर इंडिया’ म्हटलं असतं. त्यांचा सन्मान केला असता. यासाठी मोठं मन लागतं, याला कद्रुपणा चालत नाही असा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी(Eknath Shinde) ठाकरेंना लगावला.

विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना विविध मुद्द्यांवरुन अनेकवेळा घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला. याचवेळी सत्ताधारी पक्षांकडूनही विरोधकांच्या टीकेवर पलटवार देखील करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अखेरच्या दिवशी विरोधकांवर चांगलेच बरसले.

सावरकर हे महाराष्ट्राचे नव्हे तर...

राहुल गांधींनी यांनी आपण गांधी आहोत, माफी मागायला मी सावरकर नाही अशा शब्दांत भाजपला डिवचलं होतं. यानंतर भाजपकडून राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे.

आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राहुल गांधीच्या टीकेवर भाष्य करताना संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधींनी वारंवार सावरकरांचा अपमान केला आहे.पण सावरकर हे महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे दैवत आहेत. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी मरणयातना भोगल्या आहेत. अनेक हालअपेष्ठा सहन केल्या आहेत. यावेळी त्यांनी तुम्ही सावरकरांना काय समजता? असा सवालही उपस्थित केला आहे. म्हणून त्यांना त्याची शिक्षा मिळालीच पाहिजे असंही ते म्हणाले.

...म्हणून गांधींनी सेल्युलर जेलमध्ये राहून यावं...

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राहुल गांधींनी एक दिवस सावरकरांनी शिक्षा भोगलेल्या त्या सेल्युलर जेलमध्ये राहून यावं. अर्धा-एक तास त्यांना घाण्याला (कोलू) जुंपलं तर त्यांना सावरकरांच्या यातना सहन केल्या आहेत ते कळेल. म्हणून त्यांचा निषेध करावा तेवढा कमी आहे असंही शिंदे म्हणाले.

अमित शाह काय म्हणाले होते?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उध्दव ठाकरेंवर निशाणा साधताना आमच्यासोबत निवडणुका लढवल्या. पंतप्रधान मोदी यांचा फोटो प्रचारात लावला. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केलं जाईल याचा उल्लेख त्यांनी ऐकला होता. तसंच त्यांनीही तो उल्लेख केला होता. मात्र, निकाल लागल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पद मिळावं म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीचे तळवे चाटले असा हल्लाबोल शाह यांनी केला होता. यावर उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांचा उल्लेख मोगॅम्बो असा केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT