CM Eknath  Shinde
CM Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

मुख्यमंत्री शिंदेंच्या कामाचा झपाटा; 399 फाईल्सचा निपटारा

सरकारनामा ब्यूरो

Eknath Shinde : मुंबई : राज्य सरकारमध्ये (state government) निर्णय प्रक्रियेला वेग आला असून नवीन सरकारने कार्यभार स्वीकारल्यापासून ते आजतागायत जनहिताचे विविध निर्णय झपाट्याने घेतले आहेत. १ जुलै ते अगदी आत्तापर्यंत म्हणजे आठ ऑगस्टपर्यंतच्या कालावधीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 399 फाईल्सचा निपटारा केला आहे.

विशेष म्हणजे यात नैसर्गिक आपत्ती मधील मदत, गरजूंना मदत, कृषि विभाग, मंत्री मंडळासमोर अनावायचे प्रस्ताव, फाईल्स, विविध नवीन शासकीय नियुक्त्या, सरळ सेवा भरती, वन विभाग, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण अशा विविध विभागाच्या फाईल्सचा समावेश आहे.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या पहिल्याच बैठकीत विविध विभागाच्या सचिवांना सर्वसामान्यांची तसेच जनहिताची कामे गतिमान रीतीने झाली पाहिजे, तसेच लोकांची कामे अडणार नाहीत हे पाहण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जनहितासाठी तत्परतेने निर्णय घेण्यास सुरुवात झाली आहे. एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थापन झाल्यापासून मंत्रीमंडळ विस्तार रखडलेला आहे.

मात्र, मंत्रीमंडळ विस्तार रखडलेला असला तरीही मुख्यमंत्री शिंदे यांनी विविध विभागात लक्ष देत मंत्रालयातील फाईल, कमी करण्यावर भर दिला आहे. शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची सुत्रे हातात घेतल्यानंतर सांगितले होते, या टेबलाऊन त्या टेबलावर आता फाईलींचा प्रवास कमी करावा लागणार आहे. तत्पर निर्णय घेण्यात येतील असे शिंदे यांनी सांगितले होते. त्या प्रमाणे त्यांनी कामाची सुरुवात केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT