Raj Thackeray,  
Eknath Shinde
Raj Thackeray, Eknath Shinde sarkarnama
मुंबई

मुंबई महापालिकेसाठी नवी समीकरणे? शिवसेनेला घेरण्याचा भाजपचा डाव

सरकारनामा ब्यूरो

Eknath Shinde : मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ‘कृष्णकुंज’वर जाणार भेट घेतली. राज ठाकरे यांच्या घरातील श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री गेले होते. मात्र, यावेळी राजकीय चर्चाही झाल्याची चर्चा आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप, मनसे आणि शिंदे गट मिळून शिवसेनेपुढे कडवे आव्हान उभारण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे शिंदे-ठाकरे भेट महत्वाची मानली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांनी राज ठाकरे यांच्या घरी भेटी दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यानंतर आज खुद्द मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा चर्चिल्या जात आहेत. मुख्यमंत्र्यांनी गणपतीचे दर्शन घेतले असले तरी त्या ठिकाणी मुंबई महापालिका निवडणुकीवर चर्चा झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

भाजप, मनसे आणि शिंदे गट यांचा राजकीय प्रतिस्पर्धी समान असून भाजपची मुंबई महापालिका जिंकण्याची इच्छा आहे. मुंबईत आपलाच महापौर बसविण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यासाठी पदाधिकारी निवडीपासून पहिल्याच टप्प्यात मुंबईला एक कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलेले. याशिवाय मुंबई अध्यक्षपदी आशिष शेलार यांच्यासारख्या चाणाक्ष नेत्याकडे धुरा सोपविण्यात आलेली आहे. त्यांच्या काळात मागील निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ८२ नगरसेवक निवडणून आणले होते.

त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्याच पार्श्वभूमिवर भाजप नेत्यांनी राज ठाकरे यांच्या भेटी घेतल्या आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी आज राज ठाकरे यांच्या घरी भेट दिली. त्यामुळे येणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी नवीन समीकर तयार होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीव भाजप, शिंदे गट आणि मनसेची युती होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त हेात आहे. त्यामुळे राज ठाकरे आणि शिंदे भेटीत काय चर्चा झाली. याकडे मुंबईकरांचे डोळे लागले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT