Eknath Shinde News
Eknath Shinde News sarkarnama
मुंबई

Eknath Shinde : शिवसेनेच्या 'त्या' शाखेत मुख्यमंत्री येणार...

सरकारनामा ब्यूरो

डोंबिवली : डोंबिवली मधील शिवसेनेच्या (Shivsena) मध्यवर्ती शाखेरवरून ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटात मोठा राडा झाला होता. त्यानंतर ही शाखा शिंदे गटाने घेतली. आता याच शाखेला पूर्ण रंगरंगोटी करण्यात आली असून शाखेला आणि आजूबाजूच्या इमारतीला भव्य रोषणाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे उद्या (ता. १३) या शाखेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपस्थित राहणार आहेत.

उद्या रविवारी 13 नोव्हेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे डोंबिवलीत (Kalyan-Dombivali) येणार आहेत. त्यांच्या हस्ते ४४५ कोटींच्या विविध रस्त्यांच्या कामाचे भमिपूजन करणार आहे. या भमिपूजन सोहळ्याचे बॅनर डोंबिवली शहर आणि ग्रामीण भागात लावण्यात आले आहेत. तर डोंबिवली मधील ज्या शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेवरून दोन गटात राडा झाला होता, आता ती शाखा शिंदे गटाने घेतली असून मुख्यमंत्री या शाखेत उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान याच शाखेला पूर्ण रंगरंगोटी करण्यात आली असून शाखेला आणि आजूबाजूच्या इमारतीला भव्य रोषणाई करण्यात आली आहे. तर मुख्यमंत्र्यांचे मोठे होर्डिंग येथे लावण्यात आले आहेत.

शिंदे गटाचा कायदेशीर ताबा...

गेल्या महिन्याभरापासून डोंबिवली मध्यवर्ती शाखा कोणाची यावरुन वाद सुरू असल्याने तो विषय गाजत होता. शिंदे गटाला ठाकरे गटाकडून शाखेत येण्यास अटकाव झाल्याने शिंदे गटाच्या अस्तित्वाचा प्रश्न जणू निर्माण झाला होता. मात्र, त्यानंतर कायदेशीर रित्या शिंदे गटाने या शाखेवर ताबा मिळविला.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT