CM Eknath Shinde sarkarnama
मुंबई

Eknath Shinde : सीमा लढ्यातील हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना दरमहा २० हजारांची मुख्यमंत्र्यांची घोषणा

Eknath Shinde News : महाराष्ट्र - कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भातील ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

सरकारनामा ब्यूरो

Eknath Shinde News : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न तापलेला आहे. त्या पार्श्वभूमीवरच आज महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र - कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भातील ठराव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत मांडला. त्यानंतर हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

त्यामध्ये बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी या शहरांसह ८६५ गावांतील इंच-इंच जागा महाराष्ट्रात समाविष्ठ करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पाठपुरावा करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.

तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी सीमावर्ती भागातील नागरिकांसाठी यावेळी मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यामध्ये सीमाभागातील ८६५ गावांतील सीमा लढ्यातील हुतात्म्यांच्या एका कुटुंबीयांना दरमहा २० हजारांची घोषणा करण्यात आली आहे.

विधानसभेत मंजूर केलेल्या ठरावात नेमकं काय?

- कर्नाटकातील मराठी भाषिक ८६५ गावांची इंच न इंच जागा तिथल्या मराठी भाषिक नागरिकांसह कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात समाविष्ठ करण्यासाठी आवश्यक तो सर्व कायदेशीर पाठपुरावा सर्वोच्च न्यायालयात करण्यात येईल.

- तसेच सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेला सीमावाद हा कायदेशीर मार्गाने आणि अत्यंत खंबीरपणे लढा देण्यात येईल. त्याबाबत सर्व कायदेशीर पाठपुरावा सर्वोच्च न्यायालयात करण्यात येईल.

- ८६५ गावातील मराठी भाषिक जनतेसोबत महाराष्ट्र शासन खंबीरपणे निर्धाराने व सर्व ताकदीनिशी उभे राहील. तसेच याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची अमंलबजावणी करण्याचा आग्रह केंद्र सरकारने कर्नाटक सरकारकडे धरावा. तसेच सीमा भागातील मराठी जनतेच्या सुरक्षिततेची हमी घेण्याबाबत सरकारला समज देण्यात यावी.

सीमावर्ती भागातील गांवासाठी मुख्यमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा

- सीमेवरची ८६५ गाव महाराष्ट्रात सामील करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार.

- यासाठी आवश्यक तो सर्व पाठपुरावा सर्वोच्च न्यायालयात करण्यात येणार.

- सीमावर्ती भागात काम करणाऱ्या सर्व मराठी मंडळांना अर्थसहाय्य देण्यात येणार.

- ८६५ गावातील मराठी भाषिक जनतेसोबत महाराष्ट्र सरकार खंबीर उभे राहणार.

- सीमा प्रश्नी बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात येणार.

- दरमहा २० हजार मदतीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा.

- ८६५ गावातील मराठी भाषिकांना महाराष्ट्राचे नागरिक समजण्यात येणार.

- सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक जागा राखीव ठेवण्यात येणार.

दरम्यान, महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र - कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भातील ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सीमावर्ती भागातील नागरिकांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी कशी असणार? याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT