Eknath Shinde, Chhatrapati Sambhaji Raje
Eknath Shinde, Chhatrapati Sambhaji Raje sarkarnama
मुंबई

मुख्यमंत्री शिंदेंनी दिलगिरी व्यक्त केली आणि भेटायलाही बोलावले !

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मराठा समाजाच्या प्रश्नांच्या पाठपुराव्यासाठी मंत्रालयात आलेल्या छत्रपती संभाजीराजेंची (Chhatrapati Sambhajiraje) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्याशी भेट होऊ शकली नाही. त्यामुळे नाराज झालेल्या छत्रपती संभाजीराजेंची मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलगिरी व्यक्त केली.त्यानंतर त्यांना भेटायलाही बोलावले. सायंकाळी सह्याद्री अथितीगृहात दोघांची भेट झाली.

मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेण्यासाठी छत्रपती संभाजीराजे आज दुपारी मंत्रालयात गेले. मात्र, मुख्यमंत्री व्यस्त असल्याने त्यांना छत्रपती संभाजीराजेंना वेळ देता आली नाही. यावरून नाराजी व्यक्त करीत छत्रपती संभाजीराजे मंत्रालयातून बाहेर पडले. त्यांच्या या नाराजीच्या बातम्या येताच संभाजीराजेंशी संपर्क साधत मुख्यमंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्यांना तातडीने भेटण्यासाठी वेळ दिली. सायंकाळी सह्याद्री अथितीगृहात झालेल्या भेटीत मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर मागण्यांवर दोघांमध्ये चर्चा झाली.

सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्याबरोबर संभाजीराजे यांची भेट नियोजित होती. या भेटीत त्यांनी मराठा समाजाच्या विविध प्रश्नांचा आढावा घेतला व त्यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनाकडे गेले. मात्र मुख्यमंत्र्यांच्या अन्य विषयावरील बैठक सुरु असल्याने लगेच भेट होऊ शकत नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे ताटकळलेले संभाजीराजे नाराज होऊन निघून गेले.

ही गोष्ट मुख्यमंत्री शिंदे यांच्या कानावर जाताच त्यांनी स्वतः छत्रपती संभाजीराजे यांना दूरध्वनी करून दिलगिरी व्यक्त केली. ‘‘तुम्ही जिथे असाल तिथे येऊन मी भेटतो,’’ असे मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितले. त्यावर ‘तुम्ही येऊ नका, मीच येतो, असे म्हणत संभाजीराजे त्यांना भेटायला गेले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT