Eknath Shinde, Chhatrapati Sambhaji Raje
Eknath Shinde, Chhatrapati Sambhaji Raje sarkarnama
मुंबई

मुख्यमंत्री शिंदेंनी टाळली छत्रपती संभाजीराजेंची भेट

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मराठा समाजाच्या प्रश्नांच्या पाठपुराव्यासाठी आज संभाजीराजे छत्रपती (Chhatrapati Sambhaji Raje) मंत्रालयामध्ये आले होते. मंत्रालयात प्रथम त्यांनी सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे यांची भेट घेऊन आढावा घेतला. त्यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या दालनाकडे गेले. यावेळी छत्रपती संभाजीराजे यांच्यासह स्वराज्य संघटनेचे प्रतिनिधी देखील यावेळी उपस्थित होते.

मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल दीड ते दोन तास छत्रपती संभाजीराजे यांची भेट टाळली. या कालावधीत ते पक्ष प्रवेशासाठी आलेल्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत राहिले. मात्र, समाजाचे प्रश्न घेऊन आलेल्या संभाजीराजे छत्रपती यांना वारंवार निरोप देऊनही ताटकळत राहावे लागले. या प्रकारानंतर छत्रपती संभाजीराजे मुख्यमंत्री कार्यालयातून तडकाफडकी निघून गेले.

मुख्यमंत्र्यांना पक्ष प्रवेशासाठी आलेल्या नेत्यांना भेटण्यासाठी वेळ आहे. मात्र, समाजाचे प्रश्न घेऊन आलेल्या संभाजीराजे छत्रपतींना भेटण्यास वेळ नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री शिंदे यांनी यांनी संभाजीराजे यांनी भेट टाळ्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

मराठा समाजाचे विविध प्रश्न व मराठा उमेदवारांची नियुक्ती या विषयांच्या पाठपुराव्याकरिता आज मंत्रालय येथे सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे यांची भेट घेतली. यावेळी स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी माझ्यासोबत उपस्थित होते. समाजाच्या अडचणी ऐकून घेऊन त्यांची सोडवणूक व्हावी. प्रत्येक उमेदवारास त्याची हक्काची नोकरी मिळावी, यासाठी खात्यांतर्गत समन्वय साधण्याकरिता शासनाने स्वतंत्र अधिकारी नियुक्त करावा, अशी सूचना केली, असल्याचे संभाजीराजे यांनी ट्वीट करत सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT