Jitendra Awhad-Eknath shinde Sarkarnama
मुंबई

Jitendra Awhad News : आव्हाडांना मुंब्र्यात घेरण्याची मुख्यमंत्र्यांची खेळी : राष्ट्रवादीचा ज्येष्ठ नेता गळाला; माजी नगरसेवक शिंदेंच्या कार्यक्रमाला

ठाण्यात राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले. हा राष्ट्रवादी आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

सरकारनामा ब्यूरो

ठाणे : राष्ट्रवादीचे (NCP) जेष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांच्यासह ४ माजी नगरसेवकांनी १२ फेब्रुवारीचा मुहूर्त साधत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यात दुसरीकडे मुंब्रा विभागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत आज कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या खासदार निधीतून होणाऱ्या विकासकामांचा मुंब्रा, कळवा येथे भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला मुंब्र्यातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक उपस्थित लावणार असून भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे फलक शहरात लावण्यात आल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. यामध्ये आमदार जितेंद्र आव्हाडांची (Jitendra Awhad) त्यांच्याच होमपिचवर कोंडी करण्याचा प्रयत्न असल्याच्या चर्चा जोर धरू लागली आहे. (Chief Minister Shinde's attempt to trap Jitendra Awhad in Mumbra)

मुंब्र्यात राष्ट्रवादीचे १५ ते २० माजी नगरेसवक फुटीच्या वाटेवर असून बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाण्याच्या तयारीत आहेत. अशातच राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसाला बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील प्रमुख पदाधिकारी हजर राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. त्यानंतर जगदाळे यांनी स्वतः पत्रकार परिषद घेत बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले.

जगदाळे यांच्यासोबत त्यांचे सहकारी माजी नगरसेवक राधाबाई जाधवर, दिंगबर ठाकूर, वनिता घोंगरे यांच्यासह परिवहनचे माजी सदस्य संतोष पाटील, ब्लॉक अध्यक्ष सुधाकर नाईक, माजी नगरसेवक संभाजी पंडीत, युवा पदाधिकारी प्रशांत जाधवर, संदीप घोगरे आणि दिवंगत ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर चव्हाण यांच्या पत्नी सुलेखा चव्हाण यासुद्धा बाळासाहेबांची शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यामुळे ठाण्यात राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले. हा राष्ट्रवादी आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची फलकबाजी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निधीतून होणाऱ्या विकासकामांचा मुंब्रा, कळवा येथे भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राजन किणे, मोरेश्वर किणे, अनिता किणे, विश्वनाथ भगत हे देखील उपस्थिती लावणार आहे. या भूमिपूजन सोहळ्याचे फलक मुंब्रा भागात लावण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT