Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा निर्णय! संपूर्ण मंत्रिमंडळ, खासदार, आमदारांसह अयोध्येस जाणार

Ayodhya Ram Temple Inauguration Ceremony : ट्वीटद्वारे केले जाहीर, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत.

Mayur Ratnaparkhe

Mahayuti News : अयोध्येतील श्रीराम मंदिराचा ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठापना सोहळा 22 जानेवारी रोजी पार पडणार आहे. यानिमित्त जय्य त तयारी करण्यात आली आहे. या सोहळ्याचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्याची सर्वांनाच इच्छा आहे. तर, देशभरातीलच नव्हेतर जगभरातून व्हीव्हीआयपी मंडळींनाही या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. अशावेळी आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एक मोठा निर्णय जाहीर केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबतच अयोध्येला जाणार नसून, संपूर्ण मंत्रिमंडळासह महायुतीचे खासदार, आमदार, लोकप्रतिनिधींनाही नेणार आहेत. त्यांनी याबाबत ट्वीटद्वारे माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी म्हटले आहे की, 'अयोध्येत राम मंदीर उभारणीचे कोट्यवधी भारतीय आणि रामभक्त तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साकार केलं आहे. मोदींचे शतशः आभार...'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच 'अयोध्येमध्ये सोमवारी श्री प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. या ऐतिहासिक आणि नेत्रदीपक सोहळ्याचे आम्हाला निमंत्रण आहेच. देशवासीयांसाठी अभिमानास्पद अशा या अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार फक्त मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) तसेच अजितदादा पवार अशा तिघांनीच होण्याऐवजी संपूर्ण मंत्रिमंडळ, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि राज्यातील रामभक्त अशा सर्वांना घेऊन प्रभू श्री रामाचं दर्शन आम्ही घेणार आहोत. अयोध्येतल्या दर्शनाची तारीख आणि वेळ लवकरच ठरवत आहोत.' असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केलं आहे.

तर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त 22 जानेवारी रोजी केंद्र सरकारच्यावतीने सर्वच शासकीय कार्यलायांना अर्धा दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकारनेही राज्यात 22 जानेवारीला सुटीच जाहीर केली आहे. सरकारने याबाबतचा अध्यादेश जाहीर केला आहे.

या अगोदर शिवसेनेतील बंडखोरीनंतर भाजपसोबत सरकार स्थापन करून मुख्यंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या 40 आमदारांसह अयोध्येचा दौरा केला होता. तेव्हा त्यांनी शरयू नदीची आरतीदेखील केली होती. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अयोध्या राम मंदिरासाठी तब्बल 11 कोटींची देणगीही दिली गेली आहे.

(Edited by- Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT