Mumbai News : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut यांनी आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. राज्यात राजकीय घमसान सुरू असताना अशातच खळबळ उडवून देणारे आरोप राऊतांनी केले आहे. (Sanjay Raut Serious Allegations On Eknath Shinde)
राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयातून राज्याभरातल्या तुरुंगात कैद असणाऱ्या अट्टल व सराईत गुन्हेगारांशी संपर्क साधला जात असल्याचा खळबळजनक आरोप राऊत यांनी केले आहेत. या गुन्हेगारांशी डिलींग करून गुन्हेगारांना निवडणुकी आधी बाहेर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे. (Latest Marathi News)
संजय राऊत म्हणाले, "महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामधून विविध तुरूंगातल्या अट्टल गुन्हेगारांशी संपर्क केला जातोय. काही गुन्हेगारांना जामिनाची व्यवस्था करून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबतचे पुरावे लवकरच आपण सादर करणार आहोत. ३०२ सारख्या खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगारांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी गुन्हेगारांशी डिलिंगचा प्रकार सुरू आहे. "
"राज्याचे गृहमंत्री काय करत आहेत? खरंतर असल्या प्रकारांचा देवेंद्र फडणवीस यांना राग यायला हवा. मी एक लोकप्रतिनिधी आहे, पण राजकारण नंतर पाहूया. मिस्टर फडणवीस तुम्ही घटनात्मक पदावर आहात, मी काय म्हणतोय ते समजून घ्या. तुम्ही आमचं काय वाकडं करणार आहात? जे काही करायचं ते करा, पण समोरासमोर सामना करा, असा इशाराच राऊत यांनी फडणवीसांना दिला.
तुरुंगातून मोबाईलचा वापर :
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामधून तुरुंगात कैदेत असलेल्या गुन्हेगारांशी काय संवाद सुरू आहे? याची माहिती मी देणार आहे. मुंबईपासून नाशिकपर्यंतच्या विविध तुरुंगातील कैद्यांशी सरकारमधील लोक संवाद साधत आहेत. तुरूंगाच्या आतून मोबाईलचा वापर सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून जे काही प्रकार सुरू आहेत ते लवकरच बाहेर काढेन, असा इशाराही संजय राऊतांनी दिला. (Latest Marathi News)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.