Chitra Wagh challenge Anil Parba sarkarnama
मुंबई

Chitra Wagh Vs Anil Parab : ओ अनिल परब, तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते...हिंमत आहे का? चित्रा वाघांनी भरसभागृहात ललकारलं!

Chitra Wagh challenge Anil Parba : अरे मी जे केले जे मला करायचं होतं. मला जे दिसलं, मला जे पुरावे आले त्यावर लढले मी. तुम्ही तोंड शेवून बसला होता. तुम्ही घातलं होतं शेपूट, असा घणाघात चित्रा वाघांनी अनिल परबांवर केला.

Roshan More

Chitra Wagh News : विधान परिषदेमध्ये भाजप आमदार चित्रा वाघ आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांच्या जोरदार खडाजंगी झाली. अनिल परब यांनी संजय राठोड प्रकरणात तुम्ही काय केले? असा सवाल विचारला असता चित्रा वाघ आक्रमक झाल्या. त्यांनी आपल्या भाषणात अनिल परबांवर जोरदार प्रहार केला.

चित्रा वाघ म्हणाल्या, 'ओ अनिल परब हिम्मत आहे का तुमच्यामध्ये? असाल तुम्ही मोठे वकील फार मोठी पोपट पंडीत. एखाद्या विषयासाठी एखादी बाई लढते तेव्हा पाय खेचायला 100 लोकं असतात.त्यात तुमच्या सारखे आहेतच. तुम्हालाच उत्तर देत मी घाबरत नाही. तुमच्या सारखे 56 पायाला बांधून फिरते चित्रा वाघ. येथे काय वशिल्याने आलो नाही आहोत.'

'हिम्मत असेल तर यांनी (अनिल परब) विचारावं उद्धव ठाकरेंना का संजय राठोडांना क्लिनचिट दिली. अरे मी जे केले जे मला करायचं होतं. मला जे दिसलं, मला जे पुरावे आले त्यावर लढले मी. तुम्ही तोंड शेवून बसला होता. तुम्ही घातलं होतं शेपूट. आणि मला विचारता कसे काय मंत्रिमंडळात आले?', असा संताप चित्रा वाघ यांनी अनिल परबांवर व्यक्त केला.

'अनिल परब फार मोठे आहेत. विधीतज्ज्ञ आहेत. हे मी त्यांच्या आसपासच्या लोकांकडून ऐकलं होतं. मी तर कधी त्यांची हुशारी येथे पाहिली नाही. आज संजय राठोड मंत्रिमंडळात आहेत. ते मंत्रिमंडळात का आहेत? याचे उत्तर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं. मीडियासमोर उत्तर त्यांनी दिलं.', असे देखील चित्रा वाघ यांनी ठणकावले

महिलांना दादागिरी करता...

'सोयीप्रमाणे आपले तोंड गप्प करायचे अन् महिलांवर दादागिरी करायची. हिम्मत असेल तर जा विचारा उद्धव ठाकरेंना का क्लिनचिट दिली? कुठल्या मुद्यावर क्लिनचिट दिली. मी तर माजी लढाई लढले. लढणार. काही नाही मिळालं तर आमच्या घरादारावर येता.', असे प्रत्युत्तर चित्रा वाघांनी अनिल परबांना दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT