Sanjay Raut - Chitra Wagh
Sanjay Raut - Chitra Wagh Sarkarnama
मुंबई

"जनाब राऊत तुम्हाला नबाव मलिकांच्या नजरेतूनच हिंदुस्थान पाहायचाय''

सरकारनामा ब्युरो

मुंबई : '' जनाब राऊत तुम्हाला नबाव मलिकांच्या नजरेतूनच हिंदुस्थान पाहायचाय, असा सणसणीत टोला भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी शिवसेना खासदार संजय राऊतांना केला आहे.

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाने खळबळ माजली आहे. ड्रग्ज प्रकरणावरुन राज्याच्या राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झडत आहेत. संजय राऊत आणि नवाब मलिकांनी केलेल्या आरोपांनी आता एनसीबी यंत्रणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागलेत. असे असताना चित्रा वाघांनी थेट संजय राऊतांवरच आगपाखड केली आहे. राज्यातील नैसर्गिक आपत्तीवरुन चित्रा वाघांनी संजय राऊतांना डिवचलं आहे.

''जनाब संजय राऊत तुम्हाला समीर वानखेडे हा अधिकारी बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी नसून मुसलमान आहे, हे सिद्ध करणाऱ्यांची पाठराखण करण्याची का एवढी घाई लागलेली आहे, '' असा सवाल भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी शिवसेना खासदार संजय राऊतांना केला आहे.

''कोकणातील वादळग्रस्तांना मोबादला मिळत नाहीये, शेतकऱ्यांना पिकविम्याचे पैसे मिळाले नाहीत. मराठाड्यात अतिवृष्टीने बेहाल झालेल्या शेतकऱ्यांना मोबदला मिळत नाहीये, आरोग्य विभागात घोटाळा होतोय, एमपीएससीच्या तरूणांचे भविष्य अंधारात ढकललं जातंय, रोज राज्यातील लहान मुली महिलांवर लैंगिक अत्याचार होताहेत. यासगळ्या विषयावर आपल्याला भाष्य करायचे नाही, पण तुम्हाला NCB सारख्या स्वायत्त संस्थेतील एखाद्या अधिकाऱ्याला त्याच्या जातीवरून टारगेट करायचं. त्याच्यावर पर्सनल अटॅक करून त्याच्या कामावर फक्त दबाव आणायचा आहे. असा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे.

नगरमध्ये ज्या हिंदूस्थानद्रोही लोकांनी पाकिस्तानच्या विजयाचा घोषणा दिल्या आणि त्यांना विरोध करणाऱ्यांचे डोके फोडले जातात, पण तुमची यंत्रणा मात्र उलट विरोध करणाऱ्यांवरच कारवाई करते, यावर तुम्हाला बोलायचं नाही का, असा खडा सवालच चित्रा वाघांनी संजय राऊतांना केला आहे. न्यायालयीन प्रकरणावर अशा गलिच्छ पद्धतीने दबाव आणण्याच्या प्रयत्नांचा मी धिक्कार करते, असेही वाघांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT