Ashok Kharat case update : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला बलात्कारप्रकरणी अटक केल्यानंतर राजकारणात खळबळ उडाली आहे. अशोक खरातसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचेही फोटो समोर आले आहेत. खरातची पाद्यपूजा करतानाचा चाकणकर यांचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. यावरून आता चाकणकरांवर टीका होऊ लागली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यानंतर आता भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनीही नाव न घेता निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनीही चाकणकरांना घेरले आहे. वाघ यांनी सोशल मीडियात याबाबत पोस्ट केली आहे.
वाघ यांनी म्हटले आहे की, श्रद्धेच्या नावाखाली लोकांची फसवणूक करून, महिलांच्या सन्मानाशी खेळ करणाऱ्या नाशिकचा भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात ला बेड्या ठोकल्या…हेच आमच्या सरकारचं खरं काम आहे. गृह विभाग आणि राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिलं आहे की, कायद्यापुढे कोणीही मोठं नाही.
वैयक्तिक श्रद्धा प्रत्येकाची असू शकते; पण संविधानीक पदावर असताना त्या श्रद्धेची मर्यादा पाळलीच पाहिजे. जबाबदारीच्या पदावर असणाऱ्यांनी विवेक आणि संवेदनशीलता दाखवणं अपेक्षित आहे, असा टोला वाघ यांनी चाकणकरांना नाव न घेता लगावल्याची चर्चा आहे.
रुपाली पाटील यांनीही सोशल मीडियात पोस्ट करत म्हटले आहे की, अभी बात निकली है तो बहोत दूर तक जाएगी भाई. संविधानिक पदावर असलेल्या राज्य महिला आयोग अध्यक्षाच निघाल्या अत्याचाराच्या मुखिया, असा थेट आरोप पाटील यांनी केला आहे. दरम्यान, चाकणकर यांनी खरात प्रकरणावर यापूर्वीच स्पष्टीकरण दिले आहे. कॅप्टन खरात यांच्या वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला कल्पना नाही. आता जे आरोप होत आहेत, त्याबाबत पोलीस निष्पक्षपणे चौकशी करतील. पोलिस तपासावर माझा पुर्ण विश्वास आहे, असेही रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.