Mumbai News : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची स्विकारल्यानंतर धडाकेबाज निर्णयांसह मंत्र्यांसाठीही काही नियमांची अंमलबजावणी सुरु केली आहे. त्यांनी आता भाजपच्या मंत्र्यांनाही चांगलंच कामाला कामाला लावलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) दर आठवड्याला मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. मंत्र्यांचं आठवड्याचं वेळापत्रक ठरवलं आहे.दर 15 दिवसांनी भाजप मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड तयार करण्यात येणार आहे.
केंद्रातील मोदी सरकारसारखं लोकाभिमुख पारदर्शक कारभार करुन दाखवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ॲक्शन मोडवर असल्याचे दिसून येत आहे. सीएम फडणवीस यांनी अनेक विभागांना पुढील 100 दिवसांच्या कामाचा रोडमॅप सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यापासून मंत्रालयात बैठकांचा धडाका लावला असून पायाभूत सुविधासंदर्भातील निर्णयांवर त्यांचा भर दिसून येत आहे. खातेवाटप झाल्यानंतर फडणवीसांनी संबधित मंत्र्यांसोबत बैठक घेऊन आढावा घेतला जात आहे. यातच आता त्यांनी भाजपच्या(BJP) मंत्र्यांना पुढील पाच वर्षे सोपी नसणार असल्याचा संदेश दिला आहे.
सीएम फडणवीसांनी आता भाजपच्या मंत्र्यांना कामाला लावलं आहे. त्यांनी आता दर आठवड्याला मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेण्यास सुरुवात केली. शुक्रवारी (ता.31) त्यांनी मंत्र्याचा क्लास घेतला अन् आठवड्याचे वेळापत्रक निश्चित केले आहे. याचवेळी भाजप मंत्र्यांचं दर 15 दिवसांनी रिपोर्ट कार्ड तयार करण्यात येणार असल्याचा निर्णयही यावेळी घेतला आहे.
भाजप मंत्री आता आठवड्यातील सोमवार ते बुधवार मुंबईमध्ये असणार आहे. गुरूवारी आणि शुक्रवारी संबंधित मंत्री राज्यभरातील त्यांच्या खात्याच्या कामाचा आढावा घेणार आहे. आणि शनिवारी व रविवारी आपल्या मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावणार असल्याचं या बैठकीत ठरलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे प्रमुख तीनही नेते मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत दर तीन महिन्यांनी भाजप मंत्री व पदाधिकार्यांची बैठक होणार आहे. सरकारमध्ये असलेल्या भाजपनं दुसरीकडे संघटनेवर भर दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.