Mumbai News : वाल्मिक कराड याने पुणे सीआयडी कार्यालयात सरेंडर केलं आहे. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मयत संतोष देशमुख यांचे धाकटे बंधू धनंजय देशमुख यांच्याशी फोनवरून संवाद साधला. देवेंद्र फडणवीसांनी मोठं आश्वासन दिल्याची माहिती धनंजय देशमुखांनी दिले.
"जोपर्यंत हे सगळे फासावर लटकत नाही, जोपर्यंत संतोष अण्णांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही कुठेही कमी पडणार नाही. कुणीही असेल, तरी आम्ही त्यांना सोडणार नाही", असे मुख्यमंत्री फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आश्वासन दिल्याचे धनंजय देशमुखांनी सांगितले.
धनंजय देशमुख यांनी वाल्मिक कराड हा सरेंडर झाला आहे. खंडणीच्या गुन्ह्यात त्याला अटक झाली आहे. मात्र मयत संतोष अण्णाच्या हत्येतील तिघे आरोपी असून पसारच आहे. त्यांना कधी अटक होणार? सर्व आरोपींना अटक झाली पाहिजे. यात सगळ्या आरोपींना अटक करून शिक्षा करा. सीआयडी (CID) तपास करत आहे. अजून सगळ्या प्रक्रिया झालेल्या नाहीत, असे सांगून सीआयडीच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी काल गेलो असल्याचेही सांगितले.
पसार आरोपींना अटक करण्यासाठी उद्या गावकरी जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावर धनंजय देशमुख यांनी गावकऱ्यांची नेमकी काय भूमिका घेतली हे अजून मला समजलेले नाही. मी बाहेर होता. पण ते आंदोलन करणार आहे, हे मला समजले आहे, असे सांगितले.
ही घटना समाजातील विकृतींमुळे घडली. आपण आता त्याच विकृतींपासून पोलिस संरक्षणाची गरज आहे. कुटुंबाला संरक्षणाची गरज आहे. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण आहे. पुढे कोणतीही विकृत घटना होऊ नये, यासाठी संरक्षण मागत आहे. कुटुंबासमेवत गावकऱ्यांचे देखील संरक्षण होईल, म्हणून ही मागणी पोलिस अधीक्षकांकडे केल्याचे धनंजय देशमुख यांनी सांगितले.
या घटनेच्या सुरवातीपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अलर्ट आहे. शरद पवार यांनी मस्साजोग गावाला भेट देत मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी फडणवीस यांना फोन करून घटना गंभीर आहे. त्यात जातीनं लक्ष घाला, अशी विनंती फोनवरून केली होती.
मुख्यमंत्री फडणवीस या घटनेत तेव्हापासून गंभीर असून, पसार वाल्मिक कराड याने सरेंडर करताच, त्यांनी मयत संतोष देशमुख यांचे धाकटे बंधू धनंजय देशमुख यांच्याशी फोनवरून संपर्क करत संवाद साधला. जोपर्यंत संतोष अण्णांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत त्यांच्या हत्यारांना फासावर लटकवणार नाही, तोपर्यंत कोणालाही सोडणार नाही, असे आश्वासन फडणवीससाहेबांनी दिल्यांचे धनंजय देशमुख यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.