Devendra Fadnavis Rupali Chakankar Ashok Kharat .jpg Sarkarnama
मुंबई

Ashok Kharat Scam: चाकणकरांनंतर कुणाचा नंबर..? फडणवीसांनी सभागृहातूनच टाकलेल्या नव्या बॉम्बनं 'त्या' नेतेमंडळींसह अधिकाऱ्यांचंही 'काऊंटडाऊन' सुरू

Ashok Kharat Crime News: विरोधकांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी(ता.23 मार्च) अशोक खरात प्रकरणी सभागृहात आतापर्यंतच्या तपासाबाबत महत्त्वपूर्ण माहिती देणारं निवेदन दिलं. या निवेदनात मुख्यमंत्री फडणवीसांनी खरातवर पहिला गुन्हा दाखल कसा झाला यापासून ते तपास कुठपर्यंत पोहोचला याबाबत सविस्तर माहिती सभागृहाला दिली.

Deepak Kulkarni

Mumbai News: अशोक खरात प्रकरणानं महाराष्ट्र राज्याचं राजकारण अक्षरश: ढवळून निघालं आहे. महिलांवर लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर खरातला नाशिक पोलिसांनी 18 मार्चला पहाटेच्या वेळीच उचललं होतं. या प्रकरणानं राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी यांसह त्याच्या संस्थेवरील विश्वस्तांचीही झोप उडवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी दिलेल्या निवेदनावेळी मोठी घोषणा केल्यानं 'खरात कनेक्शन'चा करंट लागलेले अनेकजण गोत्यात येणार आहे.

विरोधकांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी(ता.23 मार्च) अशोक खरात प्रकरणी सभागृहात आतापर्यंतच्या तपासाबाबत महत्त्वपूर्ण माहिती देणारं निवेदन दिलं. या निवेदनात मुख्यमंत्री फडणवीसांनी खरातवर पहिला गुन्हा दाखल कसा झाला यापासून ते तपास कुठपर्यंत पोहोचला याबाबत सविस्तर माहिती सभागृहाला दिली. यावेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी खरातच्या संपर्कात आलेल्या राजकीय नेत्यांसह प्रशासकीय अधिकारी यांची करण्याची मागणी केली. यावर या सर्वांची सखोल चौकशी होणार असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी खरातसोबत फोटो आला म्हणून कुणीही दोषी होऊ शकत नाही, असंही अधोरेखित केलं.

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात सोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं विरोधी पक्षासह त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांनीही रुपाली चाकणकरांवर जोरदार शा‍ब्दिक हल्ले चढवले होते. या हल्ल्यानंतर दिवसागणिक वाढत चाललेल्या राजकीय दबावानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतरही चाकणकरांच्या अडचणी वाढत चालल्याचं दिसून येत आहे. कारण फडणवीसांनी केलेल्या घोषणेनंतर त्यांना दुसरा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या नव्या घोषणेनंतर आता कॅप्टन अशोक खरात याच्या शिवनिका ट्रस्टच्या सर्व सदस्यांचं धाबे दणाणले आहे. कारण या शिवनिका ट्रस्टच्या सर्व सदस्यांची नाशिक पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे. या ट्र्स्टमध्ये चाकणकरांचाही समावेश आहे.

तसेच फडणवीसांनी फक्त चाकणकरच नाही, तर खरात याच्या संपर्कात आलेल्या सर्व राजकीय नेतेमंडळी, प्रशासकीय अधिकारी यांचीही चौकशी होणार असल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी या प्रकरणात दोषी असलेल्या कोणालाही सोडणार नसल्याचं सभागृहात ठणकावून सांगितलं आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अशोक खरातला मदत करणाऱ्या सगळ्यांची चौकशी केली जाणार आहे. ज्यांच्याविरोधात पुरावा मिळेल, त्याच्याविरोधात कारवाई केली जाईल. डिलीट केलेला डेटा काढतोय. कोणी संपर्क केलाय, कोणी व्यवहार केलाय हा सगळा तपशील लवकरच मिळेल. मात्र, खरातसोबत केवळ फोटो असल्याने त्यांना आरोपी करता येणार नाही, असंही सीएम फडणवीसांनी स्पष्ट केलं.

सभागृहात दिलेल्या माहितीवेळी फडणवीसांनी अशोक खरात हा देश सोडून जाण्याची शक्यता होती.म्हणून सरकारवाडा पोलिसांनी 10 मार्च 2026 रोजी लुकआऊट नोटीस जारी करीत त्याच्या परदेश दौऱ्यावर बंदी आणली. एका महिलेने खरातविरोधात बलात्काराची 17 मार्च रोजी तक्रारी दाखल केल्यानंतर खरातला पोलिसांनी अटक केल्याची माहितीही सीएम फडणवीसांनी दिली. यावेळी पोलिस तपासाची सर्व अपडेट माहिती वेळोवेळी दिली जाईल,असंही विरोधकांना सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT