devendra fadnavis sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavish : देवाभाऊंनी वाढवलं जुन्या मंत्र्यांचं टेन्शन; प्रगतीपुस्तक पाहूनच पुन्हा देणार संधी VIDEO पाहा

Opportunity Only By Evaluating Old Ministers Devendra Fadnavish: जुन्या मंत्र्यांचे काम पाहून त्यांचे मुल्यमापन करुन त्यांना पुन्हा संधी द्यायची की नाही, याबाबतचा निर्णय फडणवीस घेणार असल्याने शिंदे सरकारमधील मंत्र्यांची धाकधूक वाढली आहे.

Mangesh Mahale

Mumbai News: महायुतीचे सरकार स्थापन होऊन देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. आता महायुतीतील तीनही घटक पक्षातील अनेक आमदारांना मंत्रिपदाचे वेध लागले आहे. जुन्या मंत्र्यांपैकी कोणाला पुन्हा संधी मिळणार, कुणाला डच्चू मिळणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानामुळे जुन्या मंत्र्यांचे टेन्शन वाढलं आहे.

शिंदे सरकारमध्ये जे मंत्री होते, त्यांच्या कामाचे मुल्यमापन करुन त्यांना मंत्रिपद द्यायचे की नाही, याचा निर्णय घेतला जाणार आहे. हा निर्णय खुद्द मुख्यमंत्री फडणवीस घेणार आहेत. जुन्या मंत्र्यांना नव्या मंत्रिमंडळात सरसकट स्थान दिले जाणार नाही, असे फडणवीसांनी स्पष्ट केले आहे.

मंत्रिमंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशनापूर्वी करणार असल्याचे फडणवीसांना माध्यमांना सांगितले. जुन्या मंत्र्यांचे काम पाहून त्यांचे मुल्यमापन करुन त्यांना पुन्हा संधी द्यायची की नाही, याबाबतचा निर्णय फडणवीस घेणार असल्याने शिंदे सरकारमधील मंत्र्यांची धाकधूक वाढली आहे.

नवनिर्वाचित आमदारांना शपथ देण्यासाठी विधानसभेचे तीन दिवसांचे अधिवेशन उद्यापासून (७ डिसेंबर) मुंबईत सुरू होत आहे. या अधिवेशनातच ९ डिसेंबरला विधानसभाध्यक्षांची निवड केली जाणार आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. अधिवेशन ७ ते ९ डिसेंबर या काळात घ्यावे, अशी शिफारस मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत केली आहे.

विशेष अधिवेशासाठी भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभेच्या विशेष अधिवेशनासाठी राज भवनात राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन हंगामी अध्यक्षांना शपथ दिली. आता कालिदास कोळंबकर हे विशेष अधिवेशनात नव्या आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT