Deepak Sawant | Tanaji Sawant  Sarkarnama
मुंबई

ठाकरेंनी डावलेल्या सावंत-केसरकरांना संधी; तर बच्चू कडू, यड्रावकरांना शिंदेंनी वगळलं...

Uddhav Thackeray | Eknath Shinde | Devendra Fadnavis : शिंदे सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळाचा विस्तार आज पार पडला.

सरकारनामा ब्युरो

(Cabinet expansion in Maharashtra)

मुंबई : शिंदे सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळाचा विस्तार आज पार पडला. यावेळी भाजप (BJP) आणि शिंदे गट (Eknath Shinde) या दोन्ही बाजूंनी ९-९ असे एकूण १८ मंत्री शपथबद्ध झाले. या मंत्रिमंडळात भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, गिरीष महाजन, सुरेश खाडे, अतुल सावे, मंगलप्रभात लोढा यांना संधी देण्यात आली आहे. (Maharashtra Cabinet Expansion news)

तर शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत, संदिपन भुमरे, संजय राठोड, शंभुराजे देसाई यांना संधी देण्यात आली आहे. याशिवाय दिपक केसरकर, तानाजी सावंत, यांनाही शिंदे गटाकडून सरकारमध्ये संधी देण्यात आली आहे. यापूर्वी फडणवीस सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या आणि ठाकरे सरकारमध्ये पुन्हा मंत्री होणार म्हणून या तीनही चेहऱ्यांची चर्चा होती.

मात्र उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारमध्ये ऐनवेळी मंत्रिपदांची संख्या मर्यादित झाल्याने या तिघांचाही पत्ता कट झाला होता. परंतु सावंत, केसरकर यांना शिंदे सरकारमध्ये पहिल्याच टप्प्यात संधी देण्यात आली आहे.

दुसऱ्या बाजूला ठाकरेंच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या बच्चू कडू आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांना शिंदे सरकारमध्ये संधी देण्यात आलेली नाही. हे दोघेही मंत्रिपदासाठी ते आग्रही होते. मात्र साडेदहा पर्यंत तरी यादीत नाव न आल्याने ते नाराज झाले आहेत. त्यामुळे आता ते काय भूमिका घेणार याकडे त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT