Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

राऊतांवरील कारवाईनंतर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले,'तो भोंगा आता...

Sanjay Raut ED Enquiry latest news | "अरे भोंगा नीट करा… माझा आवाज येतोय का? (येतोय येतोय… जनतेतून आवाज) आता आवाज येणारच नाही. सकाळी 8 वाजताचा भोंगा बंद झाला,. भोंगा आत गेला,"

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांना काल ईडीने (ED) अटक केली आहे. संजय राऊत यांना अटक केल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राऊतांची अटक म्हणजे लाज लज्जा शरम सोडून निर्लज्जपणाचे कारस्थान सुरु असल्याचं म्हटलं आहे. (Sanjay Raut ED Enquiry latest news)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बोचरी टीका केली आहे. शिंदे यांनी मात्र राऊतांच्या अटकेवर टोला लगावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबद दौऱ्यावर होते. संजय राऊत यांना ईडीकडून अटक झाल्याप्रकरणी औरंगाबाद येथे माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) खिल्ली उडवत यावर प्रतिक्रिया दिली.

"अरे भोंगा नीट करा… माझा आवाज येतोय का? (येतोय येतोय… जनतेतून आवाज) आता आवाज येणारच नाही. सकाळी 8 वाजताचा भोंगा बंद झाला,. भोंगा आत गेला," असं एकनाथ शिंदे म्हणाले. त्यावर सभेला उपस्थितांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून प्रचंड जल्लोष केला. "तो ८ वाजताचा भोंगा आता बंद झाला आहे. शिवाय ज्यांनी ज्यांनी आम्हाला त्रास दिला, ते आपापल्या कर्माने जातील," असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.

आज राज्यभर शिवसेनेकडून आंदोलन करण्यात येणार आहे. राऊतांच्या अटकेवर राज्यभरातून सत्ताधाऱ्यासह विरोधकांकडून प्रतिक्रिया येताना दिसत आहे. राऊत यांना ताब्यात घेतल्याचे पडसाद महाराष्ट्रातचं नाही तर संपूर्ण देशभरात उमटताना दिसत आहेत. (Sanjay Raut ED Enquiry latest news)

कॉंग्रेससह (Congress) राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून (NCP) शिवसेना खासदार संजय राऊत यांना पाठींबा दर्शवण्यात आला आहे. विविध नेत्यांकडून भाजपवर घणाघात करण्यात आला आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर सुडबुद्धीने केला जात असल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी केला आहे.

केंद्र सरकारकडून ईडी, सीबीआय आणि आयटी सारख्या प्रमुख तपास यंत्रणांचा गैरवापर केल्यासंबंधी शिवसेनेकडून राज्यसभेत कामकाजाच्या निलंबनाची नोटीस जारी करण्यात आली आहे. शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी राज्यसभेत कामकाजाच्या निलंबनाची नोटीस जारी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT