राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आणखी एका गुंडासोबतचा फोटो ट्विट करून संजय राऊत यांनी पुन्हा खळबळ उडवून दिली आहे. काही दिवसांपासून राऊत मुख्यमंत्री शिंदे यांचे गुंडांसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. त्याला अजून एकनाथ शिंदे आणि शिवसेनेकडून कुठलेली प्रत्युत्तर देण्यात आलेले नाही, हे विशेष.
एकाच आठवड्यात राज्यात दोन गोळीबारांच्या घटना झाल्या आहेत. कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी उल्हासनगरच्या हिललाइन पोलिस ठाण्यात गोळीबार केला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाची दहिसरमध्ये फेसबुक लाइव्ह करून हत्या करण्यात आली होती.
हे सुरू असतानाच ठाकरे गटाचे संजय राऊत (Sanjay Raut) मुख्यमंत्र्यांचे गुंडांशी संबंध असल्याचा आरोप करून त्यांचे गुंडांसोबतचे फोटो ट्विट करत आहेत. आज तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत एका गुंडाने सेल्फी घेतानाचा फोटा व्हायरल करून खळबळ उडवली आहे. यामुळे मुख्यमंत्री शिंदे अडचणीत येण्याची शक्यता आहे.
नाशिक शहर परिसरात हत्या, अपहरण, दरोडे यांसारखे गंभीर गुन्हे असलेला वेंकट मोरे हा गुंड मुख्यमंत्र्यांसोबत सेल्फी घेतानाचा फोटो संजय राऊत यांनी व्हायरल केल्यामुळे मुख्यमंत्री शिंदे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्याचवेळी राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवरही (Devendra Fadnavis) टीकेचे बाण सोडले आहेत.
"गृहमंत्री देवेंद्रजी यालाच म्हणतात गुंडांनी गुंडासाठी चालविलेले राज्य! नाशिक शहर परिसरात हत्या, अपहरण, दरोडे यांसारखे गंभीर गुन्हे असलेला आदरणीय वेंकट मोरे मुख्यमंत्र्यांसोबत आरामात सेल्फी घेत आहे. तुमचे मुख्यमंत्रीदेखील खूष आहेत! हे असे असल्यावर दोन पायांची कुत्र्याची पिल्ले नाहक मरणारच! हिंमत असेल तर मुख्यमंत्री त्यांचे बाळराजे यांचे गुंडांशी असलेल्या संबंधांची चौकशी करण्यासाठी SIT स्थापन करा!", असं ट्विट करत त्यांनी एसआयटीची चौकशीची मागणी केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
संजय राऊतांनी सलग 4 दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत गुंडांचे फोटो शेअर केले आहेत.
* पुण्यातील कुख्यात गुंड हेमंत दाभेकर आणि मुख्यमंत्र्यांचे खासदार पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या भेटीचा फोटो सुरुवातीला संजय राऊत यांनी शेअर केला.
डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गुंड हेमंत दाभेकरने 'वर्षा'वर जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
* राऊतांची दुसरी पोस्ट पुण्यातील गुंड नीलेश घायवळ (Pune Goond Nilesh Ghaiwal) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीची होती.
* तिसऱ्या दिवशी राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पुण्यातील गुंड जितेंद्र जंगम (Pune Goond Jitendra Jangam) यांचा फोटो शेअर केला. पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीवेळी जितेंद्र जंगमने शिंदे गटात प्रवेश केला. तेव्हाचा तो फोटो होता.
* चौथा फोटो नाशिकमधील गुंड वेंकट मोरे (Nashik Goond Venkat More) मुख्यमंत्र्यांसोबत सेल्फी घेतानाचा आहे.
(Edited by Avinash Chandane)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.