ठाणे : एकनाथ शिंदे यांनी आज मुख्यमंत्रीपदाची सुत्रे स्वीकारली. शिंदे (eknath shinde) यांनी संघर्षातून मोठे यश मिळवले आहे. शिवसेना कार्यकर्ता, रिक्षाचालक,पालिका गटनेता, आमदार, मंत्री आणि आता मुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. रिक्षाचालक ते मुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. (Eknath Shinde news update)
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना शिवसेना पक्षप्रमुख,माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना हिणवलं. या पार्श्वभूमीवर ठाण्यातील रिक्षाचालकांनी शिंदे यांच्या समर्थनार्थ फलक लावले आहेत. हे फलक सध्या ठाणेकरांचे लक्ष वेधून घेत आहेत.
उद्धव ठाकरेंनी शिंदेंना "रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट सुटली होती तिला ब्रेकच लागत नव्हता," अशा शब्दात हिणवलं होतं, पण त्याला चोख उत्तर रिक्षाचालकांनी दिलं आहे.
“मी रिक्षावाला, मी मुख्यमंत्री”, असे फलक ठाण्यात रिक्षाचालकांनी लावले आहेत. त्याच घोषणेचे टी-शर्ट घालून देखील ते रिक्षा चालवीत आहेत. "होय, मी रिक्षावाला मी मुख्यमंत्री," असे फलक लावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थन रिक्षाचालकांनी केले आहे.
शिंदेंनी आज मंत्रालयात कार्यभार स्वीकारल्यानंतर यांना समर्थन देण्यासाठी ठाण्यातील रिक्षाचालकांनी महापालिका मुख्यालय येथे घोषणाबाजी केली. "एकनाथ शिंदे आगे बढो, "धर्मवीर आनंद दिघे, बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो," अशा घोषणा दिल्या.
यावेळी माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत रिक्षाचालकांनी ही रॅली काढण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक एकनाथ भोईर,राम रेपाले,योगेश जानकर,रमाकांत मढवी, रमाकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर तसेच रिक्षा चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळेस एकमेकांना लाडू भरवून "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आगे बढो, हम तुम्हारे साथ है," अशा घोषणा दिल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.