Eknath Shinde, Manoj Jarange Patil Sarkarnama
मुंबई

Manoj Jarange Patil Uposhan : मराठा आंदोलन पेटले; मुख्यमंत्री शिंदेंची जरांगे पाटलांशी २० मिनिटं फोनवरून चर्चा

CM Shinde Reaches Out To Manoj Jarange-Patil Maratha Reservation Protest : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे जालन्याच्या अंतरवाली सराटीत उपोषण सुरू आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे.

Sachin Fulpagare

Maratha Reservation Protest : मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सकाळीच फोनवरून चर्चा झाली. जवळपास २० मिनिटं ही चर्चा झाली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. आणि आरक्षणासाठी मराठा समाज राज्यभरात आक्रमक झाला असून अनेक ठिकाणी जाळपोल आणि एसटी बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस महासंचालकांनी राज्यभरात पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी ८.४५ वाजता मनोज जरांगे पाटील यांच्याशी फोन वरून चर्चा केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात जवळपास २० मिनिटं फोनवरून चर्चा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. आणि त्यांना पाणी पिण्याचं आवाहन केलं. यानंतर जरांगे पाटील यांनी पाणीही प्यायलं आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी फोनवरील चर्चेदरम्यान जरांगे पाटलांना सरकारच्या निर्णयाची माहिती दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवर झालेल्या चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील हे सकाळी १०.३० वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांशी नेमकी काय चर्चा झाली आणि जरांगे पाटील पुढे काय भूमिका घेणार याकडे आता सार्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे हे मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत पोहोचले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT