Eknath Shinde, Dilip Dhole Sarkarnama
मुंबई

Dilip Dhole News : एकनाथ शिंदेंच्या मर्जीतील दिलीप ढोलेंना कोणी धक्का दिला ?

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असलेले मीरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांची उचलबांगडी झाली आहे. सत्ताधाऱ्यांशी जवळीक असलेल्या दिलीप ढोलेंच्या बदलीमुळे राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रात तर्क-विर्तक लढवले जात आहेत.

शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर ढोले यांचे पद सुरक्षित होते. पण शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांची एन्ट्री झाल्यानंतर काही प्रशासकीय अधिकाऱ्यांना पदावरुन हटविण्यात येऊन नवीन जबाबदाऱ्या देण्यात आल्या. यात ढोलेंची बदली केल्याने त्यांना मोठा बसल्याचे बोलले जाते. बदली नंतर ढोलेंना नियुक्ती न देता 'वेटिंग'वर ठेवलं आहे. यानिमित्ताने दिलीप ढोले कोण आहेत , याबाबत जाणून घेऊयात..

कमाल नागरी जमीन धारणा (यूएलसी) घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावल्याने मीरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांची बुधवारी तडकाफडकी बदली करण्यात आली. दिलीप ढोले यांना अद्याप नवीन नियुक्ती देण्यात आलेली नाही. मात्र, त्यांच्या जागी (मीरा-भाईंदर महापालिकेच्या आयुक्तपदी) संजय काटकर यांची नेमणूक झाली आहे.

एकनाथ शिंदे आणि अनेक नेत्यांशी ढोले यांचे निकटचे संबध असताना त्यांची बदली का झाली, असा प्रश्न सध्या विचारण्यात येत असताना सत्ताधाऱ्यांशी जवळीक असल्यामुळे हे या पदावर ठाण मांडून बसले होते, असाही आरोप त्यांच्यावर होत आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोरोनामध्ये ढोले यांची मीरा-भाईंदर महापालिकेत नियुक्ती झाली होती. एकनाथ शिंदे यांच्याकडे रस्ते विकास महामंडळाचे मंत्रीपद होते. तेव्हा ढोले हे एकनाथ शिंदे यांच्या खासगी सचिवांपैकी एक होते. त्यावेळी ते महसूल विभागाच्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबरीचे उपायुक्त दर्जाचे होते. तेव्हापासून एकनाथ शिंदे यांचे जवळचे मानले जातात. ढोले यांची मीरा भाईंदरच्या आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली होती. त्यांच्या नेमणुकीमुळे प्रशासकीय क्षेत्रात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

दिलीप ढोले यांनी २०२१ मध्ये मीरा भाईंदर महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता. सुमारे तीन महिने त्यांनी या पदावर काम केले. त्यानंतर ३ मार्च २०२१ रोजी त्यांना याच महापालिकेत आयुक्त म्हणून बढती देण्यात आली होती.

ठाणे पोलिसांनी नोव्हेंबर 2016 मध्ये यूएलसी घोटाळा शोधून काढल्यानंतर याचा तपास सुरु केला होता. यात ढोलेंवर आरोप करण्यात आले आहे. दिलीप ढोले यांच्या कार्यकाळात पोलिसांच्या ना हरकत दाखल्यानंतर एका विकासकाला परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे सक्तवसुली संचालनालयाने त्यांच्याकडे कागदपत्रे मागवली होती.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT