CM Fellowship Program sarkarnama
मुंबई

CM Fellowship Program : शिंदे-फडणवीस सरकारसोबत काम करायचं ? ; तर मग हे वाचाच

सरकारनामा ब्युरो

cm fellowship program news : "सक्रीय राजकारणात युवकांचा सहभाग वाढणे गरजेचे आहे," असे नेहमीच राजकीय नेते म्हणत असतात. त्याची अमंलबजावणी शिंदे-फडणवीस सरकारने करण्याचे ठरवलं आहे. आयआयटी, मुंबई व आयआयएम, नागपूर यांच्या माध्यमातून राज्य सरकारने युवकांना ही संधी दिली आहे.

राज्याचे धोरण निर्मिती, नियोजन, कार्यक्रमांची अंमलबजावणी या संदर्भात महत्त्वपूर्ण अनुभव या युवकांना मिळणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने फेलोशीप जाहीर केली आहे. युवकांना राज्य शासनासोबत काम करण्याची संधी देणाऱ्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. ही फेलोशीप पुन्हा सुरु करण्यात आली आहे.

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 2 मार्च 2023 असा आहे. राज्याच्या विकासात योगदान देण्याची इच्छा असणाऱ्या तरुण व होतकरू मुला-मुलींनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. 2015 ते 2020 या कालावधीत या कार्यक्रमाची अंमलबजावणी झाली होती.

काय आहे सीएम फेलोशीप..जाणून घ्या

  • मुख्यमंत्री फेलोशिप 2023 करीता अर्ज करण्यासाठी वय 21 ते 26 वर्षे दरम्यान असावे.

  • 60 टक्के गुणांसह पदवी व एक वर्षाचा कामाचा अनुभव, असे किमान निकष आहेत.

  • ऑनलाइन परीक्षा, निबंध व मुलाखत अशा त्रिस्तरीय चाचणीच्या माध्यमातून गुणवत्तेच्या आधारे फेलोंची निवड केली जाईल.

  • आलेल्या अर्जांमधून 60 युवक मुख्यमंत्री फेलो म्हणून निवडले जातील.

  • वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारच्या विविध विभाग व राज्यभरातील विविध कार्यालयांमध्ये हे फेलो वर्षभर काम करतील.

या ठिकाणी संपर्क साधा

  1. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची तपशीलवार माहिती http://mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  2. काही शंका असल्यास cmfellowship-mah@gov.in या ईमेल वर किंवा 8411960005 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT