CM Uddhav thackeray, SambhajiRaje Chhatrapati Latest Marathi News
CM Uddhav thackeray, SambhajiRaje Chhatrapati Latest Marathi News Sarkarnama
मुंबई

राजकीय घडामोडींना वेग; संभाजीराजेंचं खुलं पत्र अन् उद्धव ठाकरेंचं अपक्ष आमदारांना बोलावणं

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून सहाव्या जागेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje) यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करत महाराष्ट्रातील सर्व विधानसभा आमदारांना (MLA) खुले पत्र लिहिले आहे. पण अद्याप कोणत्याही पक्षानं त्यांना पाठिंबा जाहीर केलेला नाही. तर दुसरीकडे सहाव्या जागेसाठी शिवसेनेने संभाजीराजे यांना पक्षात येण्याची अट घातल्याची चर्चा आहे. (Rajya sabha election 2022 election update)

राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांपैकी दोन जागा भाजप तर प्रत्येकी एक जागा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनाला सहजपणे मिळणार आहे. पण सहाव्या जागेसाठी पेच निर्माण झाला आहे. या जागेसाठी संभाजीराजे आग्रही आहेत. या जागेेवर शिवसेनेने दावा सांगितला आहे. तर भाजपही उमेदवार देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रत्येक पक्षाचे संख्याबळ पाहता आता अपक्ष आमदारांना महत्व प्राप्त झालं आहे. राज्यात 13 अपक्ष आमदार आहेत. त्यापैकी काही आमदारांचा भाजपला पाठिंबा आहे. (CM Uddhav Thackeray Latest Marathi News)

सहाव्या जागेसाठी प्रत्येक मत महत्वाचं असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता वर्षा निवासस्थानी सर्व अपक्ष आमदारांची बैठक बोलावली असल्याचे समजते. यामध्ये ठाकरेंकडून राज्यसभेसाठी या आमदारांना गळ घातली जाऊ शकते. त्यामुळे सहाव्या जागेसाठी चुरस वाढली आहे.

दरम्यान, सहाव्या जागेसाठी संभाजीराजे यांचा प्रयत्न आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली उमेदवारी जाहीर केली होती. अपक्ष आमदारांनी आपल्याला सूचक आणि अनुमोदक म्हणून पुढे यावे, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेचे दोन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे संभाजीराजेंना कोण पाठिंबा देणार, याची उत्सुकता आहे. भाजपनेही आपली अतिरिक्त मते कोणाला देणार हे मात्र गुलदस्त्यात ठेवले आहे. त्यामुळे आता आज पुन्हा संभाजीराजेंनी राज्यातील सर्वपक्षीय आमदारांना आपल्याला समर्थन देण्यासाठी आवाहन केले आहे.

संभाजीराजेंनी काय म्हटलंय पत्रात?

निवडणुकीत विजयी होण्यासाठी कोणत्याही उमेदवारास विधानसभा सदस्यांच्या ४२ मतांची आवश्यकता आहे. महाराष्ट्र विधानसभेतील पक्षीय संख्याबळाचा विचार करता, या सहा जागांपैकी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या पक्षांना प्रत्येकी एक व भाजपला दोन जागांवरती विजय मिळविणे शक्य वाटते. उर्वरित एक जागेकरिता कोणत्याही एका पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नाही. करिता, या जागेवरती अपक्ष म्हणून मला संधी देण्यात यावी, असे आवाहन संभाजीराजे यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT