uddhav thackeray, aditya thackeray
uddhav thackeray, aditya thackeray sarkarnama
मुंबई

राजभवनाच्या मुख्य दारात थांबा, असं राऊत विरोधकांना का म्हणाले..

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 96 वी जयंती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन केलं. उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) हे सांयकाळी शिवसैनिकांशी (shivsena) संवाद साधणार आहेत. यानिमित्ताने शिवेसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी मुख्यमंत्र्यांचा फोटो समाजमाध्यमांवर शेअर करीत विरोधकांचे लक्ष वेधलं आहे.

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा अभिवादन करतानाचा फोटोही संजय राऊत यांनी शेअर केला आहे. त्या फोटोखाली राऊतांनी लिहिलं आहे की, आज संध्याकाळी उद्धवजी शिवसैनकांशी संवाद साधतील. आजचा दिवस महत्त्वाचा आहे. विरोधकांनी राजभवनाच्या मुख्य दारात थांबून उद्धवजींचे भाषण ऐकावे.

नगरपंचायती निवडणुक निकाल, आगामी महापालिका निवडणुका या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांशी काय संवाद साधतात, विरोधकांना काय टोले लगावणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. .

शिवसेनेचे नेते, राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांनी आपले आजोबा बाळासाहेब (Balasaheb Thackeray) यांच्यासोबतचा एक जुना फोटो शेअर करीत समाजमाध्यमांवर त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. बाळासाहेबांसोबतचा लहानपणीचा फोटो आदित्य ठाकरे यांनी शेअर केला आहे.

या फोटोमध्ये आदित्य ठाकरे क्रिकेट खेळताना दिसत आहेत. तर त्यांचे आजोबा बाळासाहेब ठाकरे हे आपल्या नातवाच्या पाठी उभे आहेत. आदित्य ठाकरे यांनी शेअर केलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना कलाकारांची अनोखं अभिवादन केलं आहे. कुणी स्टोन आर्ट काढलं तर कुणी आपट्याच्या पानावर चित्र साकारलं आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 95व्या जयंती निमित्त चित्रकार सुमन दाभोलकर यांनी बाळासाहेबांचे स्टोन आर्ट साकारलं आहे. दगडाला आकार न देता, काटछाट न करता दगडावर चित्र साकारण्यात तसेच आव्हानात्मक चित्र साकारण्यात सुमन दाभोलकर यांचा हातखंडा आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड मधील गव्हाणे गावचे युवा चित्रकार अक्षय मेस्त्री यांनी आपट्याच्या पानावर 2 इंचाचं हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे याचं चित्र काढलं आहे. आपट्याच्या पानावर अर्ध्या तासात अक्षय मेस्त्री याने हे चित्र साकारलं आहे.

संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिला. ते पत्रकारांशी बोलत होते. संजय राऊत म्हणाले, ''आज बाळासाहेब असते तर बऱ्याच या गोष्टी झाल्या नसत्या विशेषतः जी विरोधी पक्षांमध्ये आज-काल कावकाव चिवचिव चालू आहे जी तडफड सुरू आहेत ती बाळासाहेबांच्या अस्तित्व आणि थंड पडली असती.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT