Uddhav Thackeray,chandrakant patel, kirit Somaiya on Uddhav Thackeray, kirit Somaiya tweet,  Kirit Somaiya on chandrakant patel News
Uddhav Thackeray,chandrakant patel, kirit Somaiya on Uddhav Thackeray, kirit Somaiya tweet, Kirit Somaiya on chandrakant patel News  kirit somaiya tweeter
मुंबई

मोठी बातमी : मुख्यमंत्री अडचणीत ; सोमय्यांनी ठाकरेंचा 'तो' फोटो केला व्हायरल

सरकारनामा ब्युरो

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांना मंगळवारी अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजे ईडीने (ED)जोरदार झटका दिला. ईडीने पाटणकर यांचे ठाण्यातील कोट्यवधी रुपयांचे फ्लॅट्स जप्त केले. पाटणकर (Shridhar Patankar)यांची तब्बल 6.45 कोटीची संपत्ती अंमलबजावणी संचलनालयाकडून (ED)जप्त केली आहे. (Kirit Somaiya on chandrakant patel News)

या कारवाईत नंदकिशोर चतुर्वेदी (Nandkishor Chaturvedy)हे नाव पुढे आलं आहे. त्यानंतर अजून एक नाव समोर आलं आहे. भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांचा एक जूना फोटो टि्वट करुन खळबळ उडवून दिली.

'श्रीधर पाटणकर मनी लाँडरिंगचे पुष्पक ग्रुपचे चंद्रकांत पटेल (chandrakant patel)श्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत?' असं ट्विट सोमय्यांनी केलं आहे. पुष्पक ग्रुपचे चंद्रकांत पटेल यांचा उद्धव ठाकरेंसोबतचा एक फोटो सोमय्या यांनी पोस्ट करुन याबाबत सवाल उपस्थित केला आहे.

सोमय्यांनी जो फोटो टि्वट केला आहे तो फोटो नेमका कधीचा आहे याबाबतही सोमय्यांनी काहीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे आता याप्रकरणी सोमय्या आणखी कोणकोणते पुरावे देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ईडीने याबाबत श्रीधर पाटणकर यांना समन्स बजावले होते. पण ते काही समोर आले नव्हते. त्यानंतर जेव्हा ईडीला काही पुरावे मिळाले किंवा नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या शेल कंपनीची लिंक मिळाली त्यानंतर या जप्ती करण्यात आल्या आहेत. आता पुढे श्रीधर पाटणकर यांचा जबाब नोंदवला जाऊ शकतो.

श्रीधर पाटणकर प्रकरणातील महत्त्वाचा सूत्रधार नंदकिशोर चतुर्वेदी फरार झाल्याची माहिती समोर येत आहे. नंदकिशोर चतुर्वेदी यांनी देशातून पळ काढल्याची तपास यंत्रणांना माहिती मिळाली आहे. आयकर विभाग आणि ईडी चतुर्वेदीच्या मागावर आहेत. कारवाईच्या भीतीनं तो भारत सोडून आफ्रिकन देशात पसार झाल्याचं सांगितलं जातं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT