Uddhav Thackeray,Vasant More sarkarnama
मुंबई

मोठी बातमी : वसंत मोरेंना मुख्यमंत्र्यांचा फोन ; शिवसेनेत येण्याची दिली ऑफर

वसंत मोरे यांना पदावरून हटवत नगरसेवक साईनाथ बाबर यांची नवे शहराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.

सरकारनामा ब्युरो

पुणे : मशिदीवरील भोंगे काढण्याच्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निर्णयावर वसंत मोरे (Vasant More)यांनी नाराजी व्यक्त केल्यातनंतर पक्षाच्या शहराध्यक्ष पदावरून त्यांना काल हटवण्यात आले. माजी नगरसेवक व मोरे यांचे जवळचे मित्र साईनाथ बाबर यांची शहराध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर वसंत मोरे कुठल्या पक्षात जाणार याबाबत चर्चा रंगल्या आहे. "मी मनसेतच आहे. मनसैनिक म्हणून मी काम करीत राहणार,'' असे मोरे यांनी स्पष्ट केले आहे.

राज ठाकरे यांच्या निर्णयावर नाराज असलेल्या वसंत मोरेंना शहराध्यक्ष पदावरुन हटविल्यानंतर त्यांना अनेक पक्षाच्या ऑफर येत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी मोरेंनी आज फोन केला. ''शिवसेनेत येण्याबाबत विचार करावा,'' अशी ऑफर मुख्यमंत्र्यांनी मोरेंना दिली असल्याचे सुत्रांनी सांगितले.

''माझ्या शहराध्यक्षपदाची मुदत एक वर्षाची होती. जी मार्चमध्ये संपली आहे. त्यामुळे नव्या शहराध्यक्षांची निवड झाली तरी काही बिघडत नाही. आमच्याकडे राज ठाकरे यांचा शब्द अंतीम असतो. वसंत मोरेंच्या निष्ठा अजूनही राज ठाकरे यांच्यासोबत आहेत. ठाण्यातल्या उत्तरसभेला मी जाणार आहे,'' असे वसंत मोरे (Vasant More) यांनी काल स्पष्टीकरण दिले.

गेले दोन-चार दिवस या विषयावर मनसेमध्ये वाद सुरू होता. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांना ठाकरे यांनी काल मुंबईत बोलावले होते. राज ठाकरे यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर वसंत मोरे यांना पदावरून हटवत नगरसेवक साईनाथ बाबर यांची नवे शहराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आल्याचे काल दुपारी जाहीर करण्यात आले.

मनसेच्या नवीन शहराध्यक्ष साईनाथ बाबत यांचे वसंत मोरेंनी अभिनंदन केले आहे. ''मला अनेक पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी फोन येत आहे, पण मी मनसैनिक म्हणून मी काम करीत राहणार,'' असे मोरेंनी स्पष्ट केलं असले तरी त्याची पुढील राजकीय वाटचाल काय असेल हे लवकरच समजेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT