Uddhav Thackeray, Raj Thackeray
Uddhav Thackeray, Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

भगव्या शालीवरून मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना टोला; म्हणाले...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : माझ्या सत्कारावेळी मला वाटल की, मला भगवी शाल द्याल, पण त्याची मला काही गरज नाही, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरेंना (Raj Thackeray) टोला लगावला आहे. तर मला जे बोलायचय ते 14 तारखेला बोलेन असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते आज (ता.1 मे) मुंबईत शिवनेरीच्या प्रतिकृतीचं उद्घाटन पार पडलं. यावेऴी ते बोलत होते.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते आज छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमातळाबाहेर शिवनेरीच्या प्रतिकृतीचं उद्घाटन पार पडलं. यावेळी रश्मी ठाकरे, अदित्य ठाकरे, मंत्री अनिल परब, अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत आदी उपस्थित होते. यावेळी ठाकरे थोडक्यात आपले भाषण उरकले. मात्र, राज यांना टोला लगवायला ते विसरले नाही. कार्यक्रमाच्या सत्कारावेळी ते म्हणाले की, "अरविंदजी आपण सत्कारावेळी मला भगवी शाल द्याल असे वाटले होते, पण मला त्या शालीची गरज नाही", अशा शब्दात त्यांनी राज यांना टोला लगावला आणि मला जे बोलायचे आहे ते 14 तारखेला बोलेल, असा इशारा दिला आहे.

दरम्यान, आज राज्यात महाराष्ट्र दिनी औरंगाबाद येथे राज ठाकरेंची सभा होत आहे. तर मुंबईतील सोमय्या मैदानात भाजपच्या पोलखोल अभियानाचा समारोप होत आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज भोंग्याच्या मुद्दयावरून आक्रमक झालेले राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर मुंख्यमंत्र्यांच्या या आजच्या टीकेला राज ठाकरे काय उत्तर देतात हे सुद्धा बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT