मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना गुरूवारी एच. एन. रिलायन्स रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यांची मान व मणक्याचा त्रास बळावल्याने काही दिवसांपूर्वीच या रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यानंतर 22 दिवसांनी त्यांनी घरी सोडण्यात आले आहे. पण काही दिवस त्यांना घरातूनच काम करावे लागणार आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या मानेचा त्रास बळावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ता. 10 नोव्हेंबर रोजी मंत्रिमंडळ बैठकीतच त्यांनी याबाबत माहिती दिली होती. या बैठकीतनंतर रुग्णालयात दाखल होणार असल्याचे त्यांनीच मंत्र्यांना सांगितले होते. तेव्हापासून ते रुग्णालयातूनच राज्याचा गाडा हाकत होते. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मंत्रिमंडळ व इतर बैठकांमध्ये ते सहभागी होत होते.
मुख्यमंत्री ठाकरे यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असले तरी ते मंत्रालयात जाऊ शकणार नाहीत. पुढील काही दिवस त्यांना घरातूनच काम करणार आहेत. रिलायन्स रुग्णालयाचे डॉ. अजित देसाई यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री ठाकरे यांना आज घरी सोडण्यात आले आहे. आता त्यांना पुढील काही दिवस घरातून च काम करण्याचा सल्ला दिला आहे, असे डॉ. देसाई यांनी सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीन दिवसांपूर्वीच मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्हि़डीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभाग घेतला होता. तसेच त्याआधी कोविडसंदर्भात राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेऊन पुढील सूचना दिल्या होता.
कोविडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक ते सर्व करा. केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले होते. लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची बंधने पाळावीच लागतील, असं आवाहन त्यांनी नागरिकांना केले. विमानतळावर येणाऱ्या सर्व प्रवाशांकडे काटेकोर लक्ष देण्याची सुचनाही त्यांनी दिली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.