Uddhav Thackeray- Raj Thackeray Politics : राज्यात रविवार पासून सुरु असलेल्या राजकीय गदारोळानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या आमदारांसह धक्कादायकरित्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शिवसेनेतील बंडाला एक वर्ष पूर्ण होऊन काही दिवस लोटले असताना महाविकास आघाडीला हा दुसरा झटका बसला आहे. या सर्व उलथापालथीनंतर मुंबईतील शिवसेना भवनासमोर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, अशा आशयाचे बॅनर महाराष्ट्र सैनिकाकडून लावण्यात आल्याचे दिसत आहे. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार का, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
शिवसेना भवन दादर येथील शिवसेना भवनासमोर लक्ष्मण पाटील या महाराष्ट्र सैनिकाने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना महाराष्ट्रासाठी एकत्रित येण्याचे आवाहन केले आहे. या बॅनरवर म्हटले की, "महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे. राज साहेब आणि उद्धव साहेब आता तरी एकत्र या संपूर्ण महाराष्ट्र तुमची वाट बघत आहे," अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहे. त्यामुळे एकीकडे राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना दुसरीकडे या बॅनरची चर्चा सुरु झाली आहे. तसेच राज आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी एकत्रित यावे, असे आवाहन वारंवार मराठी लोकांकडून करण्यात आल्याचे पाहायला मिळाले आहे. मात्र या दोन्हीही भावांमध्ये राजकीय वैर पाहता ही शक्यता फारच कमी असल्याचेही बोलले जाते. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी देखील अनेकदा राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे यांच्यात समन्वय घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो देखील निष्फळ ठरला होता.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.