Sanjay Pandey
Sanjay Pandey 
मुंबई

महिलादिनी संजय पांडेची महिला पोलिसांना अनोखी भेट, १२ तासांची केली आठ तास ड्यूटी

Uttam Kute

पिंपरी : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे (ता.८) औचित्य साधून मुंबईतील महिला पोलिसांना (Female police) पोलिस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी अनोखी भेट दिली आहे. त्यांची बारा तासाची ड्यूटी त्यांनी आता आठ तासांची केली आहे. तसा आदेश त्यांनी कालच जारी केला. त्यानुसार आपापल्या सोईच्या तीन पाळ्यांत कामावर येण्याचे स्वातंत्र्य महिला पोलिसांना देण्यात आले आहे. याव्दारे राज्याचे प्रभारी पोलिस महासंचालक (DGP)असताना पोलिस कल्याणाचे निर्णय घेण्याचा परिपाठ मुंबईत आय़ुक्त म्हणून आल्यानंतरही पांडे यांनी सुरुच ठेवल्याचे दिसून आले आहे. (Sanjay Pandey reduced the duty of women police from 12 hours to 8 hours)

डीजीपी असताना पांडे यांनीच गेल्यावर्षी २७ सप्टेंबरला महिला पोलिसांना आठ तासांची ड्यूटी देण्याचा प्रयोग राबविण्यास सांगितले होते. त्यानुसार प्रथम नागपूरात तेथील पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी ती सुरु केली. त्यानंतर पुणे ग्रामीणला हा प्रयोग सुरु आला. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्येही त्याची अंमलबजावणी करण्याचे ठरले होते.मात्र,तो सुरु झाला नाही. पुरेशा मनुष्यबळाअभावी तूर्त ते शक्य नसल्याचे सांगण्यात आले.

पोलिसांचे गेल्या कित्येक वर्षाचे महत्वाचे प्रलंबित प्रश्न वर्षभराच्या आपल्या प्रभारी डीजीपी पदाच्या काळात मार्गी लावणाऱ्या पांडे यांनी मुंबईत आय़ुक्त म्हणून येताच तेथेही त्यांनी आपले विधायक कम्यूनिटी पोलिसिंगचे काम सुरु ठेवले आहे. नो पार्किंगमधील वाहने आठवडाभर टोन करण्याचा मुंबईकरांच्या दृष्टीने सुखद अशा पहिला निर्णय त्यांनी लगेच घेतला. त्यानंतर आठवड्यातच त्यांनी महिला पोलिसांची ड्यूटी आठ तास करून महिला पोलिसांना सुखद धक्का महिला दिनी दिला. तसा कार्यालयीन आदेश त्यांनी ७ मार्चला काढला. त्यानुसार महिला पोलिसांना तीन पाळ्यात त्यांच्या सोईनुसार काम देण्यास सांगितले आहे. त्यासाठी महिला पोलिसांशी सबंधित पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक तथा पोलिस ठाणेप्रमुखांनी चर्चा करावी, असे सुचविण्यात आले आहे. सकाळी आठ ते दुपारी तीन, दुपारी तीन ते रात्री ११ आणि रात्री ११ ते सकाळी सात अशा तीन शिफ्टमध्ये आठ तास काम करण्याची सवलत महिला पोलिसांना देण्यात आली आहे. यामुळे कौटुंबिक जबाबदारी व्यवस्थित पार पाडता येणार असल्याने महिला पोलिसांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे.

आठ तास पोलिस ड्यूटीची संकल्पना तशी मीरा बोरवणकरांची

आठ तास पोलिस ड्यूटी ही संकल्पनाफक्त महिला पोलिसांनाच नाही,तर सर्रास सर्वच पोलिसांसाठी दहा वर्षापूर्वी त्यावेळी पुणे पोलिस आयुक्तालयातील परिमंडळ तीनमध्ये असलेल्या भोसरी पोलिस ठाण्यात राबवली गेली होती.सध्या हे ठाणे १५ ऑगस्ट २०१८ रोजी स्थापन झालेल्या स्वतंत्र अशा पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात आहे. त्यावेळी पुण्याच्या पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर होत्या. तर,भोसरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक हे सुधीर अस्पत होते.

अस्पत यांनी आपल्या पोलिस ठाण्यात आठ तास ड्युटीचा प्रस्ताव नसल्याचा आऱाखडा दिला तो आयुक्तांनी मंजूर केल्यानंतर अंमलात आला होता. व्हीव्हीआयपी बंदोबस्त असतानाही ही ड्यूटी तशीच सुरु होती. त्याजोडीने पोलिसांचे वाढदिवस त्यांच्या कुटुंबासह पोलिस ठाण्यात साजरे करण्यात येत होते. त्यामुळे या उपक्रमाचा चांगला परिणाम दिसून आला होता. मात्र, बोरवणकर यांची बदली झाल्यानंतर ही योजनाही काही महिन्यांतच गुंडाळली गेली होती. तत्पूर्वी तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी स्वत: भेट घेऊन या प्रयोगाची पाहणी केली होती. एवढेच नाही, तर त्यावेळच्या केंद्र सरकारने दिल्लीच्या पोलिस आयुक्तांना भोसरीत पाठवून या प्रयोगाची दखल घेतली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT