MLA Vinod Nikole Latest Marathi News
MLA Vinod Nikole Latest Marathi News Sarkarnama
मुंबई

एकमेव मत कुणाला? अखेर डाव्या पक्षानं केलं जाहीर

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी प्रत्येक आमदाराच्या मताला महत्व प्राप्त झालं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसह भाजपकडून मतांची जुळवाजुळव करण्यासाठी धावाधाव सुरू आहे. राज्यात माक्सर्वादी कम्युनिस्ट पक्षाचाही एक आमदार आहे. अखेर पक्षाकडून बुधवारी याबाबत अधिकृतपणे घोषणा करण्यात आली आहे. (Rajya Sabha Election Latest Marathi News)

पक्षाचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली. दहा जून रोजी महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांसाठी मतदान होणार आहे. राज्यातील सामाजिक सौहार्द आणि स्थैर्याच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी आमच्या पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांच्याशी संपर्क साधून या निवडणुकीत महाविकास आघाडीस आमच्या पक्षाचा पाठिंबा मागितला असल्याचे नारकर यांनी स्पष्ट केलं आहे. (Communist Party will support Mahavikas Aghadi)

महागाईने त्रस्त झालेल्या कामगार, शेतकरी, शेतमजूर, युवक, विद्यार्थी आणि महिलांच्या दुर्दशेस केंद्रातील भाजप सरकारच जबाबदार आहे. कोव्हिड बंधनांचा लाभ उठवत शेतकरीविरोधी तीन कृषी कायदे (जे शेतकऱ्यांच्या गौरवशाली लढ्यामुळे मोदी सरकारला मागे घ्यावे लागले) आणि स्वातंत्र्यपूर्व काळापासून कामगारांनी लढून मिळवलेले हक्क पायदळी तुडवणाऱ्या चार श्रमसंहिता मोदी सरकारने लादल्या, असल्याची टीका नारकर यांनी केली.

या सर्व कारणांसाठी भाजपला धडा शिकवण्यासाठी या राज्यसभा निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कमिटीने महाविकास आघाडीच्या उमेदवारांस पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, असं नारकर यांनी जाहीर केलं. सहावी जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी भाजपने घोडेबाजार मांडला आहे.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विधानसभा सदस्य विनोद निकोले (Vinod Nikole) या घोडेबाजारापासून कटाक्षाने दूर असून ते या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील, असं नारकर यांनी स्पष्ट केलं. महाविकास आघाडीचे सरकार जनतेच्या न्याय्य आकांक्षा पुरवत आपली राजवट भाजपपेक्षा पूर्णतः वेगळी, संविधानिक मूल्यांची जोपासना करणारी असल्याचे दाखवील, या रास्त अपेक्षेनेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे, असंही नारकर यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT