Complaint Against Sanjay Raut  Sarlkarnama
मुंबई

Complaint Against Sanjay Raut : मोदींची तुलना औरंगजेबाशी करणाऱ्या संजय राऊतांविरोधात भाजपने उचललं मोठं पाऊल; घेतला 'हा' निर्णय...

Chetan Zadpe

Mumbai News : लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता सर्वच पक्षांकडून जोरदार तयारीसह वेगवेगळी रणनीती आखण्यात येत आहे. निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता लागू केल्यानंतरही जोरदार टीका-टिप्पणी, राजकीय वार-प्रतिवार केले जात आहेत. यातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर आक्षेपार्ह टीका केली होती. यामुळे आता भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाकडे राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. (Latest Marathi News)

राज्यसभेचे सदस्य व ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींविरोधात केलेले वक्तव्य भाजपच्या जिव्हारी लागल्याचे दिसते. भाजपने संजय राऊत यांची तक्रार निवडणूक आयोगाकडे दिली आहे. राऊतांचं पंतप्रधानांबद्दल केलेले विधान बदनामीकारक आणि विद्वेष पसरणार असल्याचे भाजपने तक्रारीत म्हटले आहे. संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना औरंगजेबाशी केली होती. याची तक्रार आता थेट निवडणूक आयोगाकडे (Election) करण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काय म्हणाले होते संजय राऊत?

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जम्नाला आले आणि औरंजेबचा जन्म गुजरातमध्ये झाला. गुजरातमध्ये जेथे मोदी जन्माला आले, त्याच्याच बाजूला दाहोद नावाचं गाव आहे. तेथे औरंगजेब जन्माला आला. म्हणून ही औरंगजेबची वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून महाराष्ट्रावर चाल करून येत आहे. शिवसेना आणि आमच्या स्वाभिमानाच्या विरोधात चाल करून येत आहे, असे वक्तव्य राऊत (Sanjay Raut) यांनी प्रचार सभेत केले होते.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT