Mahesh Tapase, Santosh Bangar sarkarnama
मुंबई

बांगरांच्या शक्तीप्रदर्शनाविरोधात महेश तपासेंची राजशिष्टाचार विभागाकडे तक्रार

आमदार संतोष बांगर MLA santosh Bangar यांनी कायद्याचे उल्लंघन Violation of the law केले असल्याने त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, असेही महेश तपासे Mahesh Tapase यांनी म्हटले आहे.

Umesh Bambare-Patil

मुंबई : शिवसेना बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी सह्याद्री अतिथीगृहात आपल्या समर्थकांसह शक्तीप्रदर्शन करुन राजशिष्टाचार कायदा मोडला आहे. त्यामुळे राजशिष्टाचार विभागाने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

सह्याद्री अतिथीगृहाचा वापर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल व राज्याने निमंत्रित केलेल्या पाहुण्यांसाठी आणि प्रशासकीय कामासाठी केला जातो. मात्र, असे असताना आमदार संतोष बांगर यांनी आपल्या समर्थकांसह शक्तीप्रदर्शन केले.

हे शक्तीप्रदर्शन करण्याचे व्यासपीठ नसताना तसा प्रकार जाणुनबुजुन करण्यात आला ही चुकीची घटना आहे. आमदार संतोष बांगर यांनी कायद्याचे उल्लंघन केले असल्याने त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, असेही महेश तपासे यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT