Confidential meeting of NCP leaders; Consideration of all party candidates for District Bank
Confidential meeting of NCP leaders; Consideration of all party candidates for District Bank 
मुंबई

राष्ट्रवादीच्या नेत्यांची किवळमध्ये खलबते; जिल्हा बँकेत सर्वपक्षिय उमेदवारांचा विचार

सरकारनामा ब्यूरो

कऱ्हाड : शेतकर्‍यांची अर्थवाहिनी असणार्‍या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक सर्वपक्षियांचा समावेश करुन लढवण्यासाठी विचार सुरु आहे. उमेदवार निवडीबाबतचा निर्णय सर्वपक्षीय पदाधिकारी यांच्याशी विचार विनिमय करून घेण्याचा सुर किवळ (ता. कऱ्हाड) येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत उमटला. 

किवळ येथे माजी उपायुक्‍त तानाजीराव साळुंखे यांच्या निवासस्थानी सुमारे दोन तास झालेल्या गोपनीय बैठकीस विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सहकार व पणन मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने, बँकेचे संचालक नितीन पाटील उपस्थित होते. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व आमदार मकरंद पाटील काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत. 

रामराजे नाईक-निंबाळकर यांनी यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासन उत्तम असून, बँकेचा नावलौकीक देशात आहे. बँकेस उच्चतम कार्यक्षता व आर्थिक व्यवस्थापणाचे नाबार्डचे पुरस्कार मिळाले आहे. सुलभ कर्ज धोरणामुळे जिल्ह्यातील सामान्य शेतकर्‍यांची आर्थिक सबलता वाढल्याचे सांगितले. सहकारमंत्री पाटील यांनी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे काम चांगले सुरु आहे.

निवडणुकासाठी कौशल्य वापरून सर्व पक्षांतील सदस्यांना व हितचिंतकांना बरोबर घेऊन बँकेची निवडणूक पार पाडण्याची जबाबदारी जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने माझ्याकडे दिली आहे. मी सर्व पक्षातील हितचिंतकांचा विचार घेऊन न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. दरम्यान बैठकीत उमेदवार निवडीबाबतचा निर्णय सर्वपक्षीय पदाधिकारी यांचेशी विचार विनिमय करून घेतला जाणार असल्याचा सुर उमटला. किवळचे माजी सरपंच सुनील साळुंखे यांनी आभार मानले.

यावेळी राज्य लेखा समितीचे अध्यक्ष शहाजीराव क्षीरसागर, शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, कऱ्हाड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष देवराज पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जितेंद्र पवार, सह्याद्रिचे संचालक संजय थोरात, पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या सरचिटणीस संगीता साळुंखे, डॉ.विजय साळुंखे, मानसिंग मोहिते, निवासराव पाटील, महेंद्र मांडवे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT