Manoj Jarange Patil, Chhagan Bhujbal Sarkarnama
मुंबई

Maratha Vs OBC Reservation : आरक्षणाचा तिढा! मनोज जरांगे-छगन भुजबळांतील वाद चिघळणार?

Sunil Balasaheb Dhumal

Mumbai Political News : मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या. त्यांना ओबीसी आरक्षणात वाटेकरी करू नका. मराठ्यांच्या स्वतंत्र आरक्षणाला आमचा पाठिंबाच आहे, असा पुनरुच्चार मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळांनी केला. दरम्यान, कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीवर ठाम असलेले मनोज जरांगे पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे. आता ते भुजबळांना काय उत्तर देणार, याकडे लक्ष आहे. (Latest Political News)

मराठा समाजातील सरसकट लोकांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी करत मनोज जरांगे पाटलांनी उपोषण केले. यातून मार्ग काढण्यासाठी महिनाभरात सरकारकडूनही जोरदार प्रयत्न केले जात आहेत. मात्र, यास राज्यातील ओबीसी समाजाच्या वतीने आक्षेप घेण्यात आला.

ओबीसी आरक्षणात कुणालाही वाटेकरी करू नका, या मागणीसाठी राज्यभर आंदोलने झाली. यातूनच मनोज जरांगेंनी ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. या पार्श्वभूमीवर मुंबईत समता परिषदेची बैठक पार पडली. या वेळी भुजबळांनी मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, त्यास आमचा निर्विवाद पाठिंबा असेल, असे सांगितले. (Maharashtra Political News)

भुजबळांच्या या भूमिकेवर मनोज जरांगे पाटलांनी कडाडून टीका केली होती. मराठा आणि कुणबी पूर्वीपासून एकच आहेत. तशी कागदपत्रे असल्याचा दावा जरांगेंनी केला होता. त्यामुळे भुजबळांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यात मिठाचा खडा टाकू नये, असे धडकपणे सुनावले होते.

राज्यात ओबीसीविरुद्ध मराठा असा वाद सुरू झाल्याची चर्चाही होती. आता जरांगे आणि भुजबळ हे दोघेही आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने हा वाद चिघळण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT