Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Shivsena UBT : निकालानंतर ठाकरे गटात वाद पेटला; 'या' मुद्द्यावरून थेट उद्धव ठाकरेंनाच जाब विचारला

Uddhav Thackeray : सत्तासंघर्षात ठाकरेंच्या पराभवासाठी पक्षाची घटना महत्वाची ठरली

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : ठाकरे-शिंदेंच्या सत्तासंघर्षात शिंदेंनी बाजी मारली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी ठाकरे गटाने सादर केलेली घटनेतील दुरुस्ती अमान्य केली. ठाकरे गटाने सादर केलेले प्रतिज्ञापत्रही फेटाळण्यात आले. दरम्यान, दोन्ही गटाकडून बाजावलेला व्हीप पोहचवण्यात त्रुटी असल्याचे सांगून सर्व आमदारांना पात्र ठरवले आहे.

आता खरी शिवसेना मुख्यमंत्री शिंदेंची झाल्यानंतर ठाकरे गटात वाद उफाळल्याचे समोर आले आहे. त्यास नार्वेकरांनी अमान्य केलेली पक्षाची 2018 मधील घटना दुरुस्ती कारणीभूत ठरत असल्याची माहिती आहे. ठाकरेंनी ज्या आधारावर युक्तीवाद केला, त्या घटना दुरुस्तीची नोंद निवडणूक आयोगाकडे नसल्याकडे नार्वेकरांनी लक्ष वेधले. आता या मुद्द्यावरूनच ठाकरे गटातील काही नेत्यांनी थेट उद्धव ठाकरेंनाच जाब विचारल्याचे समजते.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रशासकीय कामाची जबाबदारी अनिल देसाई आणि सुभाष देसाई यांच्यावर सोपवलेली आहे. याबाबत संजय राऊत, अरविंद सावंत आणि सुभाष देसाई, अनिल देसाई हे उद्धव ठाकरेंशी चर्चा करण्यासाठी मातोश्रीवर गेले. त्याचवेळी ठाकरे गटातील नेत्यांनी 2018 मध्ये पक्षाच्या घटनेतील दुरुस्तीचा मुद्दा उपस्थित करत ठाकरेंसमोर नाराजी व्यक्त केली.

सत्तासंघर्षात ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा पराभव होण्यात शिवसेनेची घटना महत्वाची ठरल्याचे बोलले जात आहे. अध्यक्षांसमोर झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाने पक्षाच्या घटनेत 2018 मध्ये दुरुस्ती करून सर्व निर्णयांचे अधिकार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दिल्याचे म्हटले होते. मात्र त्या दुरुस्तीबाबत निवडणूक आयोगाकडे कुठलीही नोंद नाही, असे म्हणत नार्वेकरांनी ठाकरे गटाचा युक्तीवाद फेटाळला.

परिणामी पक्षाच्या 1999 ची घटना समोर ठेवून निर्णय निश्चित केला आहे. त्यानुसार पक्षातील निर्णय घेताना राष्ट्रीय कार्यकारिणीला विश्वासात घेणे आवश्यक होते. परिणामी ठाकरेंनी शिंदेंची केलेली गटनेतेपदावरील हाकालपट्टी अमान्य करण्यात आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वादाचं कारण काय ?

ठाकरे गटातील काही नेत्यांनी आता 2018 मधील घटनादुरुस्तीच्या मुद्द्यावर बोट ठेवले आहे. 2018 मध्ये पक्षाच्या घटनेतील बदलांची निवडणूक आयोगात नोंद का नाही, असा थेट प्रश्न उपस्थित केला. निवडणूक आयोगात दुरुस्तीसह घटनेची प्रत सोपवली असेल, तर त्याची कॉपी पत्रकार परिषद घेऊन समोर आणावी. तसेच पक्षाकडे ती कॉपी नसेल तर देसाईंना याबद्दल विचारणा करण्यात यावी, अशी सडेतोड मागणी काही नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याची माहिती आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT