CM Uddhav thackeray, SambhajiRaje Chhatrapati Latest Marathi News Sarkarnama
मुंबई

संभाजीराजेंची माघार पण शिवसेना ठरली व्हिलन; काँग्रेस-राष्ट्रवादीचाही उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sambhajiraje Chhtrapati | Shivsena | Congress : संभाजीराजे खासदार झाले नाहीत हे खरंच दुर्दैवी आहे, परंतु काँग्रेसचा त्यांना नेहमीच पाठिंबा राहील

सरकारनामा ब्युरो

(Sambhajiraje chhtrapati | Shivsena Latest news)

मुंबई : माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. मुंबईत पत्रकार परिषद घेवून त्यांनी याबाबतची घोषणा केली. दरम्यान ही माघार नाही, माझा स्वाभिमान आहे, असं संभाजीराजेंनी स्पष्ट केलं. यावेळी बोलताना त्यांनी या सगळ्या घडामोडींसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना जबाबदार ठरले आहे. तसेच त्यांच्यावर दिलेला शब्द मोडला असल्याचा गंभीर आरोपही केले. (Sambhajiraje chhtrapati latest News)

संभाजीराजेंच्या या भूमिकेमुळे शिवसेना संभाजीराजे छत्रपतींना माणणाऱ्या समर्थकांमध्ये आणि संघटनांमध्ये व्हिलन ठरली आहे. असे असतानाच दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही शिवसेनेवर निशाणा साधला आहे. संभाजीराजे खासदार झाले नाहीत हे खरंच दुर्दैवी आहे, परंतु काँग्रेसचा त्यांना नेहमीच पाठिंबा राहील, असे म्हणतं नाना पटोले यांनी या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे.

नाना पटोले म्हणाले, इतर पक्षांचे माहित नाही, परंतु संभाजीराजे राज्यसभेत जावे अशी कॉंग्रेसची मनापासूनची इच्छा होती. महाराष्ट्राच्या नेतृत्वाची वेगळी शान त्यांच्या नेतृत्वामुळे होती. ते खासदार झाले नाहीत हे खरंच दुर्देवी! परंतु काँग्रेसचा त्यांना नेहमीच पाठिबा राहिलं, असे म्हणतं नाना पटोले यांनी माघार घेतल्यानंतर संभाजीराजे यांना काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे घोषित केले.

तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंंत्री धनंजय मुंडे यांनीही संभाजीराजेंच्या उमेदवारीत राजकारण झाल्याचे मान्य केले. ते म्हणाले, छत्रपती संभाजीराजे विषयी आम्हाला आदर असून, पक्षाचे नेते शरद पवार साहेबांनी त्यांना समर्थन देण्याचे जाहीर केले होते. परंतु त्यानंतर झालेला संपूर्ण राजकारण आपल्याला माहीतच आहे. त्यानंतर आज छत्रपती संभाजीराजे यांनी माघार घेतली आहे. पण याबद्दल ते स्वतः अधिक चांगल्या पद्धतीने सांगू शकतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT