Eknath Shinde Sena Sarkarnama
मुंबई

BMC office controversy : महापालिकेत शिंदेसेनेची पायाभरणीच डळमळली; ‘वास्तुदोष’चा बहाणा, काँग्रेसचा थेट हल्ला!

Congress Slams Shinde Sena for Rejecting BMC Office Over Vastu Dosh : मुंबई महापालिकेने दिलेल्या कार्यालयात वास्तुदोष असल्याचे कारण देणाऱ्या शिंदेसेनेला काँग्रेसला डिवचलं.

Pradeep Pendhare

Shiv Sena Shinde faction : मुंबई महापालिकेत पक्षांना कार्यालयाचं वाटप करण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेला देऊ केलेले कार्यालय घेण्यास नकार दिला आहे. वास्तुदोष असल्याचे कारण देत, हा शिंदेसेनेने नकार दिला आहे.

कार्यालयाचे स्थान आणि कार्यालयाच्या दरवाजाच्या दिशा, यावरून शिंदेसेनेने कार्यालय घेण्यास नकार दिला आहे. शिंदेसेनेच्या या वास्तुदोषावर काँग्रेसने पलटवार केला आहे. 'कार्यालयाची दिशा महत्त्वाची नाही, तर विकासाची दिशा असली पाहिजे,' असा टोला काँग्रेसने शिंदेसेनेला लगावला आहे.

मुंबई महापालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते अश्रफ आझमी यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी महापालिकेतील पक्ष कार्यालयाची पाहणी करून कार्यालयाचा ताबा घेतला. या वेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेने कार्यालयात वास्तुदोष असल्याचे सांगून, देऊ केलेले कार्यालय घेण्यास नकार दिल्यावरून शिंदेसेनेला काँग्रेसने डिवचलं आहे.

महापालिकेतील कार्यालयात वास्तुदोष असल्याचे सांगत शिंदेसेनेने ते नाकारले. वास्तुदोष हा ज्याचा त्याचा भावनेचा प्रश्न आहे, काँग्रेस पक्षासाठी मात्र सर्वसामान्य मुंबईकरांचे (Mumbai) हित महत्त्वाचे आहे. कार्यालयाची दिशा महत्त्वाची नाही, तर विकासाची दिशा असली पाहिजे, असे काँग्रेसने सांगितले.

भाजपचा मुंबईकरांच्या पैशावर दरोडा

दरम्यान, काँग्रेसचे गटनेते अश्रफ आझमी यांनी, प्रशासक राजमधील मुंबई महापालिका बँकेतील ठेवी आणि पालिकेतील भ्रष्टाचारावर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली. महापालिकेत मागील चार वर्षांपासून प्रशासक राज सुरू होता. या काळात भाजप महायुतीने मुंबईकरांच्या पैशावर दरोडा टाकला आहे. विकासकामाच्या नावाखाली खिसे भरण्याचे काम केले आणि मुंबईकरांना मात्र वाऱ्यावर सोडले, असा आरोप केला.

शिक्षण, आरोग्य, बेस्ट सेवा, पिण्याचे पाणी अन् प्रदूषण

'महापालिकेतील भ्रष्टाचाराला आळा घालण्याबरोबरच शिक्षण, आरोग्य, बेस्ट सेवा, पिण्याचे पाणी, प्रदूषण या महत्त्वाच्या प्रश्नावर महापालिकेत काँग्रेसचे नगरसेवक आवाज उठवतील व जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करतील,' असेही नगरसेवक अश्रफ आझमी यांनी म्हटले.

ठेवींबाबत श्वेतपत्रिका काढा...

प्रशासक राजमध्ये महापालिकेतील 90 हजार कोटींच्या ठेवींवरही डल्ला मारला आहे, यासंदर्भातील श्वेतपत्रिका काढा, अशी मागणी या वेळी अश्रफ आझमी यांनी केली. नगरसेवक ज्ञानराज निकम, रुकसाना पारेख, मेहर मोहसीन हैदर, मुंबई काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, माजी नगरसेवक बब्बू खान, जावेद जुनेजा, मोहसीन हैदर आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT