Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar  Sarkarnama
मुंबई

Hanumant Pawar Slams Mungantiwar: पवारांचा एकेरी उल्लेख, मुनगंटीवारांवर काँग्रेस संतप्त ; 'सत्तेच्या मस्तीतून ..'

सरकारनामा ब्यूरो

Congress Hanumant Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एकेरी उल्लेख केला. मुनगंटीवार यांचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते हनुमंत पवार यांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.

"भाजपा आणि संघ परिवाराशी नातं सांगणाऱ्या या मंत्री पद भूषवणाऱ्या महोदयांना सार्वजनिक आयुष्यात बोलायचं कसं याचं भान नसेल तर यांच्या संस्कारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होणं साहजिक आहे. निरंकुश सत्तेच्या मस्तीतून अशी बेताल भाषा येते की सत्ता जाण्याच्या असुरक्षेतून येते हे माणस शास्त्रज्ञ मंडळींनी शोधलं पाहिजे," असे हनुमंत पवार यांनी म्हटलं आहे.

हनुमंत पवार म्हणाले, "वरिष्ठ नेत्यांना खूष करण्यासाठीही भाजपातील अनेकजण सोनिया गांधी, राहुल गांधी, नितीशकूमार, उद्धव ठाकरे , शरद पवार आणि विरोधकांबद्दल असं बरळत सुटतात. मुनगंटीवार साहेब नव्हते अशा स्पर्धेत पण त्यांनीही आता कंबरेचं सोडून डोक्याला बांधलं वाटतं. अपेक्षा, पवार साहेबांची माफी मागतील,"

काय म्हणाले होते सुधीर मुनगंटीवार..

भाजपमध्ये ओबीसींचा सन्मान होत नाही”, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना केला आहे. यावर सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “आमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ओबीसी नेते आहेत. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी आहेत. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ओबीसी आहेत का? राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री ओबीसी आहेत का? छगन भुजबळ स्वतःला ओबीसी नेते म्हणवतात, पण सरकारमध्ये असताना अन्न आणि नागरी पुरवठा विभाग घेऊन बसले होते. त्यांना तिथे महत्त्व नाही.

काँग्रेसचा पंतप्रधान कोण आहे? तर एक ब्राह्मण आहे, जो जाणवं घालतो. राष्ट्रवादी काँग्रेसचा २२ वर्षांपासून अध्यक्ष कोण आहे? मराठा शरद पवार, तो आम्हाला अक्कल शिकवणार का? जनतेलाही हे समजलं पाहिजे की, मायावी चेहरे घेऊन बसलेल्या या लोकांपासून त्यांनी दूर राहिलं पाहिजे. हे लोक आपल्यासमोरचा मोठा धोका आहेत, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT