Balasaheb Thorat
Balasaheb Thorat  Sarkarnama
मुंबई

देशमुख, मलिकांनी मतदान न केल्यास काय घडणार? थोरातांनी सांगितलं राजकीय समीकरण

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यसभा निवडणुकीमुळं (Rajya Sabha Election) राजकीय वातावरण तापलं आहे. या निमित्ताने महाविकास आघाडी विरुद्ध भाजप (BJP) असा सामना पाहायला मिळणार आहे. एका-एका मतासाठी धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदान करता येणार की नाही, याबाबत अनिश्चितता आहे. त्यांना मतदान न करता आल्यास काय घडेल, याचं उत्तर काँग्रेस नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी दिलं आहे. (Rajya Sabha Election News Updates)

राज्यसभेच्या सहाव्या जागेवर शिवसेनेकडून (Shivsena) संजय पवार तर भाजपकडून धनंजय महाडिक मैदानात उतरले आहेत. भाजप आणि शिवसेनेकडून आमदारांची जुळवाजुळव करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यातच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्यामुळं महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं आहे. त्यांना मतदान करण्याची परवानगी देण्याबाबत न्यायालय निर्णय घेणार आहे. यामुळे या दोन मतांबद्दल अद्याप अनिश्चितता आहे. हक्काची दोन मते मिळावीत, यासाठी महाविकास आघाडी न्यायालयाच्या निर्णयाकडे डोळे लावून बसली आहे.

यावर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांची मते मिळाली नाहीत तरी महाविकास आघाडीचाच विजय होईल. संजय पवार हे शिवसेनेचे जुने कार्यकर्ते आहेत. महाविकास पाचवी जागा निवडून येण्यात कोणतीही अडचण नाही. आमच्यासाठी ही निवडणूक अवघड नाही. कारण आमच्याकडं अपक्षांसह मित्र पक्षांच बळ आहे. आमच्यासोबत येणाऱ्या सगळ्यांना आम्ही बरोबर घेऊ. आम्हाला मदत करणारे अनेक जण आहेत.

महाविकास आघाडीच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. यावर बोलताना थोरात म्हणाले की, एकाही मताची चूक होऊ नये यासाठी आम्ही काळजी घेत आहोत. एखादा आमदार जरी गैरहजर राहिला तरी त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर होऊ शकतो. आम्ही आमचं गणित व्यवस्थित तयार केलं आहे. आम्ही ते यशस्वीपणे सोडवणार आहोत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT