Nana Patole News, CM Uddhav Thackeray News sarkarnama
मुंबई

नाना पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र ; केली ही विनंती

आघाडी सरकारमध्ये (mva government)अंतर्गत वाद असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सरकानामाब्युरो

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांपासून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात राजकीय धुळवडच सुरु आहे. यात केवळ आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आणि राजकीय कुस्ती सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. या सगळ्या विरोधक आणि सत्ताधारी दोघेही अजिबातच मागे नाही. पण महाविकास आघाडी सरकारी ज्या मुद्यावरुन स्थापन झाले त्यांचे काय झाले, असा सवाल कॉग्रेसने उपस्थित केला आहे. (Nana Patole News)

महाविकास आघाडीत (Mahavikas Aaghadi) सारं काही आलबेल आहे असं नेते सांगतात. मात्र तसं काही नीट आहे असं तरी वाटत नाही. याचं कारण कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांना लिहिलेले पत्र. आघाडी सरकारच्या घटक पक्ष असलेल्या कॉग्रेसने मुख्यमंत्र्यांना किमान समान कार्यक्रमाची आठवण करून दिल्याने आर्श्चय व्यक्त करण्यात येत आहे.

आघाडी सरकारमध्ये (mva government)अंतर्गत वाद असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. पटोलेंनी किमान समान कार्यक्रमाची आठवण मुख्यमंत्र्यांना करून दिली आहे.

या पत्रात सीएमपीद्वारे दलित मागासवर्गीय (ओबीसी) आणि अल्पसंख्याक यांच्या कल्याणासाठीच्या योजनाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. कोरोनामुळे योजना राबविण्यास विलंब झाल्याचे पत्रात नमूद केले आहे.'कोरोनाच्या काळात मागील 3 वर्षात सीपीएमपी शक्य झाले नाही. परंतु, आता कोरोनाची लाट ओसरली आहे. त्यामुळे सीएमपी पुन्हा राबवावी, दलित आणि मागासवर्गीय (ओबीसी) समाजासाठी योजना राबवून त्याची अंमलबजावणी करावी, अशी विनंतीही पटोले यांनी केली.

''काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या निर्देशानुसार राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकार हे किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर सत्तेत आलेलं आहे. मागील दोन वर्षांत करोनामुळं राज्य सरकारपुढं अनेक समस्यांचा डोंगर उभा होता. आता परिस्थिती पूर्वपदावर येत असून यापुढं किमान समान कार्यक्रम राबविला जाईल,'' असं पटोले म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT