मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अल्टीमेटमनंतर राज्यातील अनेक भागातील मशिदींमधील अजानसाठी आता भोंग्याचा वापर होताना दिसत नाही. राज ठाकरे यांनीही बुधवारी माहिती देताना 92 टक्के मशिदींवरील भोंगे बंद झाल्याचे सांगितले होते. पण आता राज ठाकरे यांच्या या भूमिकेचा फटका मंदिरांनाही बसताना दिसत आहे. काँग्रेसचे नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी आकडेवारी देत ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
सावंत यांनी भोंग्यांबाबत न्यायालयाच्या निकालाचा दाखला देत मनसेवर (MNS) टीका केली आहे. याबाबत सावंत यांनी ट्विट करत म्हटले आहे की, मुंबई पोलीस अॅक्ट ३८(१) अन्वये मुंबईत पोलीस लाऊडस्पीकर लावण्यास परवानगी देतात. यात किती व केवढा वेळ वापरण्याचा नियम नाही. सर्वोच्च न्यायालयाने रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत मर्यादा घालून डेसिबलवर नियंत्रण ठेवले. याव्यतिरिक्त कोणतेही बंधन नाही.
आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन झाले वा रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत कोणी वापर केला तर तक्रार करता येते. पहाटेची अजान स्वतः मुस्लिम समाजाने बंद केली आहे. पण आता काकड आरतीही बंद झाली. वस्तुस्थिती ही की मनसेमुळे हिंदूचे अधिक नुकसान झाले आहे, अशी टीका सावंत यांनी केली आहे.
कालपर्यंत केवळ 20 मंदिरांकडे परवानगी
मुंबईत एकूण २४०४ मंदिरे व ११४४ मस्जिद आहेत. कालपर्यंत केवळ २० मंदिराकडे परवानगी आहे. तर ९२२ मस्जिदींकडे परवानगी आहे. ५ मंदिरांचे व १५ मस्जिदींचे अर्ज प्रलंबित आहेत. मनसेचे ऐकलं तर २४०० मंदिरांनाही तसेच चर्च, गुरुद्वारा, बौद्ध मंदिरांना भोंगे वापरता येणार नाहीत. सार्वजनिक उत्सवांना परवानगी मिळणार नाही.पोलिसांनी घेतलेल्या बैठकीत सर्वधर्मीय प्रतिनिधींनी मनसेला निकराचा विरोध केला आहे. महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर, शिर्डीची काकड आरती बंद झाली. हे पाप कोणाचे? मनसेचा राजकीय स्वार्थापोटीचा अविचार व भाजपाचा अजेंडा पुरोगामी महाराष्ट्राला घातक आहे. भाजपाशासित राज्यांनी बंदी का घातली नाही? याचे कारण स्पष्ट आहे, असं सावंत यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.