Narendra Modi Sarkarnama
मुंबई

आपलं ट्विटर अकाऊंट वाचवता येत नाही, ते देश काय वाचवणार?

हॅकर्सनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच ट्विटर अकाऊंट हॅक केल्याचे उघड झाले होते.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : संकेतस्थळ, ट्विट किंवा फेसबुक अकाऊंट हॅक होण्याची उदाहरणे काही नवीन नाहीत. पण हॅकर्सनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचेच ट्विटर अकाऊंट (Twitter Handle) हॅक केल्याचे उघड झाले होते. काही काळापुरते हे अकाऊंट हॅक करून हॅकर्सने त्यावरून एक महत्वाची घोषणाही करून टाकली होती. या ट्विटमुळं जगभरात एकच खळबळ उडाली होती. आता यावरुन विरोधकांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ट्विटर अकाऊंटवरून दररोज ट्विट करत असतात. त्यांचे दैनंदिन महत्वाचे कार्यक्रम, भाषणे, देशभरातील विविध महत्वाच्या घडामोडींवर भाष्य, घोषणा ते करतात. काल (ता.12) पहाटे अशीच एक घोषणा त्यांच्या याच अकाऊंटवरून करण्यात आली. भारताने अधिकृतपणे बिटकॉईनला (Bitcoin) कायदेशीर मान्यता दिल्याची घोषणा त्यात करण्यात आली. सरकारने 500 बिटकॉईन खरेदी केली असून ते देशातील नागरिकांना वाटली जाणार आहेत, असंही या ट्विटमध्ये म्हटलं होतं.

विरोधकांनी यावरुन मोदींना लक्ष्य केले आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी म्हटले आहे की, चौकीदार अपना ट्विटर अकाउंट नहीं बचा सकता वह देश की सीमा कैसे बचा सकता हैं? और भक्त कहते हैं भारत इनके हाथ में सुरक्षित है।

The tweet shared on PM Modi's account after it was hacked.

काल पहाटे 2 वाजून 11 मिनिटांनी हे ट्विट करण्यात आलं होतं. मागील काही दिवसांपासून बिटकॉईनवर जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच हे ट्विट आल्याने एकच खळबळ उडाली. पंतप्रधानांनी पहाटे हे ट्विट केल्यानं आश्चर्यही व्यक्त केलं जाऊ लागलं. पण सुमारे तासाभराने पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबत खुलासा करण्यात आला. पंतप्रधानांच ट्विटर अकाऊंट काही काळापुरते हॅक झाल्याचे कार्यालयाकडून सांगण्यात आले.

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट अकाऊंट काही काळापुरते हॅक झाले होते. त्यानंतर ट्विटकडे याबाबत तक्रार गेल्यानंतर हे अकाऊंट पुन्हा पूर्ववत करण्यात आले आहे. या काळात कोणतंही ट्विट केलं असल्यास त्याकडं दुर्लक्ष करायला करावे,' असं पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटरवर म्हटलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमकडून हॅकर्सचा सोध घेतला जात असून त्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.

दरम्यान, मागील वर्षी सप्टेंबर महिन्यातही पंतप्रधान मोदींच्या संकेतस्थळाचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले होते. त्यावेळी क्रिप्टोकरन्सीबाबतही ट्विट होतं. तसेच नागरिकांना कोविडसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमध्ये दान करण्याचे आवाहनही करण्यात आले होते. त्यानंतर काही मिनिटांतच हे अकाऊंट हॅक जॉन विक नावाच्या व्यक्तीने हॅक केल्याचे ट्विट त्यावरच करण्यात आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT