Nana Patole, Rahul Gandhi, Sanjay Raut, Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Mahavikas Aghadi : 'मी हे मान्य करणार नाही...'; काँग्रेसच्या नेतृत्वात 'मविआ'चं सरकार, पटोलेंच्या 'त्या' वक्तव्यावर राऊतांचा आक्षेप

Sanjay Raut objections to Nana Patole statement: राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी एकाच टप्प्यात मतदान पार पडलं आहे. मतदानानंतर आता राज्यात महाविकास आघाडी की महायुतीची सत्ता येणार? याबाबतचा अंदाज विविध एक्झिट पोलकडून वर्तवण्यात आला आहे. तर मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी वाढली आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 21 Nov : राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी एकाच टप्प्यात मतदान पार पडलं आहे. मतदानानंतर आता राज्यात महाविकास आघाडी की महायुतीची सत्ता येणार? याबाबतचा अंदाज विविध एक्झिट पोलकडून वर्तवण्यात आला आहे.

तर मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी वाढली आहे. त्यामुळे या वाढलेल्या मतदानाचा फायदा कोणाला होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र, निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) मुख्यमंत्रिपदावरून पुन्हा एकदा रस्सीखेच सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी काँग्रेसच्या नेतृत्वात राज्यात महाविकास आघाडीचं सरकार बनेल असं वक्तव्य केलं आहे. त्यांचं हे वक्तव्य ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊतांना खटकल्याचं पाहायला मिळत आहे. कारण राऊत यांनी पटोले यांनी केलेला दावा आपल्याला मान्य नसल्याचं म्हटलं आहे.

मुख्यमंत्रि‍पद काँग्रेसकडे असेल याचे संकेत पटोले यांनी दिल्याच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, "मी हे मान्य करणार नाही आणि कोणीही मान्य करणार नाही. जर नाना पटोले यांनी असे म्हटलं असेल तर त्यांच्याकडे काँग्रेसची कमान आहे का? मुख्यमंत्रिपदाबाबत आम्ही एकत्र बसून ठरवू.

आणि जर ते मुख्यमंत्री होणार आहेत असं काँग्रेस हायकमांड सांगितलं असेल तर राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि सोनिया गांधी यांनी तशी घोषणा करावी.", असं राऊत म्हणाले. तर राऊतांच्या (Sanjay Raut) या वक्तव्यामुळे आता पुन्हा एकदा काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत महाविकास आघाडीतील मुख्यमंत्रिपदावरून वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून आघाडीचा मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा कोण? यावरून वाद सुरू होता. ठाकरे गटाचा उद्धव ठाकरे यांचा चेहरा जाहीर करून निवडणुकीला सामोरं जाण्याचा प्रस्ताव शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसने फेटाळला होता. त्यानंतरही संजय राऊत यांनी अनेकदा राज्याचं आणि महाविकास आघाडीचं नेतृत्व ठाकरे करतील असा दावा केला होता.

मात्र, त्यावर कोणीही उघड भाष्य केलं नव्हतं. मात्र, आता राज्यातील निकाल काँग्रेसच्या बाजूने लागणार असं दिसताच पटोले यांनी टायमिंग साधत मुख्यमंत्रि‍पदाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता आघाडीतील तिन्ही पक्ष मुख्यमंत्रि‍पदासाठी कोणतं सूत्र अवलंबणार हे 23 तारखेनंतरच स्पष्ट होऊ शकतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT