Balasaheb Thorat
Balasaheb Thorat  Sarkarnama
मुंबई

काँग्रेसचे पाच आमदार नॅाट रिचेबल; बाळासाहेब थोरात म्हणाले...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शिवसेनेचे (ShivSena) नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. ते शिवसेनेच्या अनेक आमदारांना घेऊन गुजरामध्ये सुरतला गेले आहेत. त्यातच आता काँग्रेसचे (Congress) पाच आमदार नॅाट रिचेबल असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, हि माहिती चुकीची असल्याचे काँग्रेसचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.

काँग्रेसचे सगळे आमदार प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्या संपर्कात असल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. संध्याकाळी थोरात यांच्या निवासस्थानी आमदारांची बैठक होणार आहे. तसेच विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे गटनेते बाळासाहेब थोरात यांच्या राजीमान्या संदर्भातील बातम्या चुकीच्या असून खोडसाळपणे पेरल्या जात आहेत. बाळासाहेब थोरात त्यांच्या रॉयलस्टोन या शासकीय निवासस्थानी असून राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेवून, असल्याची माहिती आहे.

सोमवारी विधान परिषदेचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये काँग्रेसचे तीन मते फुटली होती. भाई जगताप यांना पहिल्या पसंतीची १९ आणि चंद्रकांत हंडोरे यांना २२ मते मिळाली होती. काँग्रेसची स्वतःची ४४ मते आहेत. मात्र, त्यांच्या उमेदवारांना ४१ मते मिळाली होती. त्यामुळे काँग्रेसची ३ मते फुटली, असे सांगितले जात होते.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी सुरु आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी तातडीने पक्षाचे प्रमुख नेते व आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत पुढील रणनीती ठरवण्यात आली आहे. बैठकीनंतर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी धक्कादायक माहिती दिली. शिंदे यांच्यासोबत असलेल्या नऊ आमदारांचे अपहरण झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी दिल्याचे राऊत यांनी सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT