Pravin Darekar
Pravin Darekar sarkarnama
मुंबई

Mumbai : एका कुटुंबाला खुश करण्यासाठी काँग्रेसचे आंदोलन...प्रवीण दरेकर

Umesh Bambare-Patil

मुंबई : काँग्रेसच्या आंदोलनाला काडीचा प्रतिसाद मिळत नसून त्यांच्या कार्यालयाबाहेर केवळ पोलिसांचाच फौजफाटा दिसत आहे. ताब्यात घ्यायला कार्यकर्ता पोलिसांना मिळालेला नाही. केवळ एका कुटुंबाला खुश करण्यासाठी काँग्रेसचा हा केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याची टीका भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी काँग्रेसच्या आजच्या आंदोलनावर केली आहे.

काँग्रेसच्या आंदोलनाची श्री. दरेकर यांनी खिल्ली उडवली. ते म्हणाले, काँग्रेसच्या आंदोलनाला काडीचा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. काँग्रेस कार्यालयाबाहेर १०० पोलिसांचा मोठा फौजफाटा दिसत होता. पण, ताब्यात घ्यायला कार्यकर्ते पोलिसांना मिळाले नाहीत. एवढी केविलवाणी अवस्था काँग्रेसची झाली आहे. केवळ एका कुटुंबाला खुश करण्यासाठी काँग्रेसचा हा केविलवाणा प्रयत्न आहे.

परिवाराला वाचविण्यासाठी काँग्रेसकडून दुर्दैवी, केविलवाणा, असहाय्य प्रयत्न सुरू असल्याची टीका त्यांनी केली. राज्यपालांवरून भाजपवर टीकेची झोड उठवली जात आहे, याविषयी श्री. दरेकर म्हणाले, महाराष्ट्राच्या राज्यपालाइतका जनतेला सर्वसामान्यांना उपलब्ध असलेला राज्यपाल मी २० वर्षात पाहिलेला नाही. रितसर मार्गाने साध्यातील साध्या माणसाला ते भेटतात. केवळ नौटंकीचा उद्देश असेल व प्रसार माध्यमासमोर येऊन नौटंकी करायची असेल तर त्यांना कशाला राज्यपाल भेटतील, असा टोलाही त्यांनी लगावला.

भाजप ईडीची कारवाई सुडबुध्दीने करत असल्याची टीक होत आहे, याविषयी विचारले असता ते म्हणाले, भाजपकडून ईडीची कारवाई सुडबुध्दीने होत नाही. कारण ईडीही स्वतंत्र स्वायत्त संस्था आहे. यापूर्वीही अशा अनेक कारवाया झाल्या. पण आता प्रसार माध्यमांतून या कारवाईचा बाऊ केला जात आहे. कारवाईला विरोध केला जात असून जाणीव पूर्वक कारवाई होत नाही. चुकीची कारवाई केली तर न्याय व्यवस्था आहे.

काँग्रेसच्या आंदोलनावरून दरेकर म्हणाले, या देशात आंदोलने कोणालाही करायचा अधिकार आहे. पण, नौटंकीच आंदोलनातून करायची असेल तर शासनाला सूचना करण्याचा कोणालाही अधिकार आहे. राजकिय दृष्ट्या बेरोजगारी आल्याने त्याची चिंता त्यांना खात आहे. आपल्या देश आर्थिक दृष्ट्या आवाक्यात ठेवण्यासाठी मोदी साहेबांचा प्रयत्न असून ते संवेदनशील पंतप्रधान आहेत.

संजय राऊतांच्या चौकशीत त्यांच्या पत्नीलाही बोलावले आहे, याविषयी ते म्हणाले, राऊत यांच्या चौकशीत कुठेतरी वर्षा राऊत यांचा संदर्भ आलेला असावा म्हणून त्यांना बोलावले असेल. दरम्यान, मुंबई बँकेत पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन आम्ही सर्वजण संस्थेच्या हित व प्रगतीसाठी एकत्र येत असतो. त्यामुळे मतभेद बाजूला ठेवत आर्थिक सक्षमतेसाठी एकत्रित काम करण्याच्या निर्णय घेतलेला आहे. त्यातूनच अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणार आहोत.

मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर झाल्याबद्दल अजित पवारांकडून टीका होत आहे, याविषयी दरेकर म्हणाले, अजित दादांना माहिती आहे, एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते घाबरणारे नाहीत. मंत्रिमंडळ विस्तारला उशीर होतोय. पण, लवकरच विस्तार होईल पक्षाचे वरिष्टांचा निर्णय असतो, त्यावर मी भाष्य करणे योग्य नाही. वसंत पोरे आणि मनसे ताकतीविषयी काय बोलावे देशाचा पंतप्रधान मनसेचा व्हावा, अशा माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT